नानांनी ज्ञानप्रबोधिनीची भेट आणि होणारा वादही टाळला

१ जानेवारीला नानांच्या (Nana Patole) या दौऱ्याची सुरुवातच सकाळी ११ वाजता या शाळेला भेट देऊन होणार होती.

नानांनी ज्ञानप्रबोधिनीची भेट आणि होणारा वादही टाळला

Nana Patole

Sarkarnama

पिंपरी : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी -चिंचवड, पुण्यासह जिल्हा (भीमा कोरेगाव) दौरा होता. त्याची सुरुवात पिंपरी-चिंचवडमधील (निगडी) ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या भेटीने होणार होती. दरम्यान, हा दौरा जाहीर झाल्यापासून ही शाळा भेट होणार का? याविषयी मोठी उत्सुकता होती. कारण ती वादग्रस्त ठरण्याची भीती होती. कॉंग्रेसच्या विचारधारेपेक्षा वेगळे विचार (उजवे) असलेल्या व आरएसएसची (RSS) मातृशाळा तथा संघविचाराचे विद्यार्थी घडविण्याचे काम करणारी शाळा, अशी वंदता ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयालविषयी असल्याने नाना खरंच या शाळेचा दौरा करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ही बाब वेळीच लक्षात आल्याने नानांनी ही भेट टाळली अन् त्यामुळे पुढे होणारा वादही टळला.

<div class="paragraphs"><p>Nana Patole</p></div>
असा झाला सदाशिव लोखंडेंचा चेंबूर ते शिर्डी राजकीय प्रवास

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारीला नानांच्या या दौऱ्याची सुरुवातच सकाळी ११ वाजता या शाळेला भेट देऊन होणार होती. मात्र, ती चुकवून त्यांनी पुढे दुपारी 12 वाजता दापोडीतील कार्यक्रमाला हजेरी लावली. नंतर तेथून ते भीमा-कोरेगावसाठी रवाना झाले. या दिवसातील सर्व कार्यक्रमांना त्यांनी ज्ञानप्रबोधिनी वगळता हजेरी लावली. २३ डिसेंबरला निगडीतील ज्ञानप्रबोधिनीचे केंद्र प्रमुख मनोज देवळेकर यांनी नानांना पत्र लिहून या शाळेला भेट देण्याची विनंती केली होती. ती त्यांनी लगेच मान्यही केली होती. कारण मूळचे नागपूरकर असलेले त्याचे पिंपरी-चिंचवडकर मित्र अमित मेश्राम यांची त्यात मध्यस्थी होती. दरम्यानच्या काळात विचारसरणीतील मोठा फरक नानांच्या जवळच्या वर्तुळातील पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आला. म्हणून त्यांनी पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये चौकशी करून खात्री केली अन् नानांची ज्ञानप्रबोधिनीची भेट रद्द झाली. विभिन्न विचाराची ही शाळा असल्यानेच तेथील नानांचा कार्यक्रम टाळण्यात आल्याचे कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयातून 'सरकारनामा'ला सांगण्यात आले.

दरम्यान, ही भेट झाली असती, तर वाद झाला असता. कारण स्पष्टवक्ते स्वभावाच्या नानांकडून या भेटीत स्वभावानुसार परखड वक्तव्य होण्याची दाट भीती कॉंग्रेसजणांना होती.

<div class="paragraphs"><p>Nana Patole</p></div>
चिंता वाढली : Omicron चा पहिला बळी गेलेल्या शहरात करोनाची रुग्णसंख्या झाली तिप्पट

मेश्राम यांच्या मध्यस्थीतून नानांची ही शाळा भेट आयोजित करण्यात आली होती, असे निगडी ज्ञानप्रबोधिनीचे देवळेकर यांनी रविवारी (ता.२ जानेवारी) 'सरकारनामा'ला सांगितले. नानांची शाळा भेट का रद्द झाली, अशी विचारणा त्यांना केली असता शाळेत गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी नानांच्या या शाळा भेटीला परवानगी नाकारल्याने ती होऊ शकली नसल्याचे ते म्हणाले. तसेच, आऱएसएसची शाळा वा संघविचाराचे विद्यार्थी घडविणारी शाळा हा ज्ञानप्रबोधिनीवरील आरोप चुकीचा असून असा कुठलाच शिक्का शाळेवर नाही,असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी शाळा राष्ट्रप्रेमी असल्याचे सांगत आम्हाला कुणाचेही वावडे नसल्याचे ते त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.