चंद्रकांत पाटलांनी का केला पुणे मेट्रोचे निषेध 

यापुढच्या कार्यक्रमाला फडणवीस यांना निमंत्रण नसेल तर तो कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही.
chandu patil.jpg
chandu patil.jpg

पुणे : पुण्यात मेट्रो सुरू करण्यात सर्वाधिक वाटा केंद्र सरकार आणि तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा आहे. तरीही मेट्रोची ट्रायल किंवा कोणत्याही कामात मेट्रोचे प्रशासन राज्य सरकारच्या दबावाखाली काम करीत असून आपण मेट्रो प्रशासनाचा (Pune Metro) निषेध करीत आहोत, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज म्हटले आहे.(Why Chandrakant Patil protested against Pune Metro) 

सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,‘‘ गेल्या आठवड्यात घाई-घाईत मेट्रोच्या वनाज ते मयूर कॉलनी या दरम्यानच्या तीन किलोमीटरच्या अंतरावर मेट्रोची ट्रायल झाली. हा कार्यक्रम घाईत उरकरण्यात आला. विकासाच्या कामाला आम्ही कधीच विरोध करीत नाही. त्यामुळे या कार्यक्रमात आम्ही सहभागी झालो. मात्र, अशाप्रकारे कार्यक्रम घाईत उरकून मेट्रोच्या माध्यमातून राज्य सरकार श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या होर्डींवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरण्यात आला नाही.राज्य सरकारच्या दबावाला पुणे मेट्रो बळी पडत असून या प्रकाराचा आपण निषेध करीत आहोत.’’

पुणे मेट्रोचा खर्च ११ हजार कोटी रूपये आहे. यातील सहा हजार कोटी रूपयांच्या कर्जाला केंद्र सरकारने हमी दिली आहे. शिवाय दोन हजार कोटी रूपये केंद्र सरकारने दिले आहेत.एकूण ११ हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पातील आठ हजार कोटी रूपये केंद्र सरकारमुळे उभे राहिले असताना या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्रदेखील लावण्यात आलेले नाही हे निषेधार्ह असल्याचे पाटील यांनी सांगितले. मेट्रोला केंद्र सरकारने परवानगी दिली. त्यासाठी निधी दिला. फडणवीस सरकारने आवश्‍यक त्या परवानग्या तातडीने दिल्याने मेट्रोचे काम सुरू केले असताना त्यांना कार्यक्रमाला बोलविण्यात येत नाही. त्यामुळे यापुढच्या कार्यक्रमाला फडणवीस यांना निमंत्रण नसेल तर तो कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.  

घाई-घाईत उद्धाटनाचे कार्यक्रम करून राज्य सरकारला श्रेय घेता येणार नाही. मेट्राचे काम कुणामुळे सुरू झाले आणि त्याचे फुकटचे श्रेय आता कोण घेऊ पाहात आहे हे पुणेकर चांगलेच ओळखून आहेत, असे टोला प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राज्य सरकारला लगावला. 

Edited By ; Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in