Raj Thackeray : पोटनिवडणुकांमध्ये मनसे कुणाचा प्रचार करणार? राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना महत्वपूर्ण आदेश

Kasba -Chinchwad By Election : कसबा पोटनिवडणुकीत मनसे तटस्थ राहणार ?
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Pune Mns News : कसबा पोटनिवडणुकीत भाजप काँग्रेस तर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु केला आहे. यात मनसेनं आपला उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे मनसे नेमका कुणाचा प्रचार करणार यावर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, आता याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना महत्वपूर्ण आदेश दिले आहेत.

पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर मनसे उमेदवार उभा करणार असल्याची चर्चा होती. तसेच मनसे कार्यकर्त्यांचीसुध्दा या दोन्हीही पोटनिवडणुका लढविण्याची तयारी आग्रही भूमिका घेतली होती. यासंबंधीची बॅनरबाजीही मनसेच्या इच्छुक उमेदवारांकडून करण्यात आली होती.यामुळे मनसे निवडणूक लढविणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं. पण राज ठाकरे यांनी अचानक कसबा, चिंचवड या दोन्हीही पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीयांना पत्राद्वारे आवाहन केलं होतं.

Raj Thackeray
Solapur Municipal Election : सोलापुरात महाआघाडीचं ठरलं; पण जागा वाटपात शिवसेनेची कोंडी होणार : ४०: ४०: २० चा फॉर्म्युला

राज ठाकरे(Raj Thackeray) तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानंतरही पुण्यातील दोन्हीही पोटनिवडणुका लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतला. यावेळी आप, संभाजी ब्रिगेड, हिंदू महासंघ यांसह विविध संघटनांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे.मात्र, मनसेनं दोन्हीही ठिकाणी आपला उमेदवार दिेलेला नाही.

तसेच भाजपच्या उमेदवाराला पाठिंबाही जाहीर केलेला नाही. त्यामुळे मनसे या पोटनिवडणुकीत कुणाचा प्रचार करणार आणि राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. याचवेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पोटनिवडणुकीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

Raj Thackeray
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर शिंदे सरकारचं मोठं पाऊल; घेतला 'हा' निर्णय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाचे आदेश कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज ठाकरे रविवारी आणि सोमवारी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

याप्रसंगी पुण्यातील पोटनिवडणुकांमध्ये माझे पुढील आदेश येईपर्यंत कुणीही प्रचारात सहभागी होऊ नका अशा स्पष्ट सूचना राज ठाकरे यांनी दिली आहे. राज ठाकरेंचा आदेश येईपर्यंत कसबा पोटनिवडणुकीतील प्रचारात कोणीही सहभागी होऊ नका. पदाधिकारी प्रचारात आढळून आल्यास मनसे (Mns)कडून कारवाई केली जाणार असल्याचाही इशाराही दिला आहे.

कसबा पोटनिवडणुकीत ( Kasba By Election) तटस्थ राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच माझा आदेश येईपर्यंत भाजपा किंवा महाविकास आघाडी अथवा इतर अपक्ष अशा कुणाच्याही प्रचारात सहभागी होऊ नका असे पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com