राष्ट्रपतीपदासाठी चर्चेतील नाव की मोदींचे धक्कातंत्र !

गेल्यावेळी वेगवेगळी नावे चर्चेत होती. मात्र, अचानकपणे तेव्हाचे बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करण्यात आले.
राष्ट्रपतीपदासाठी चर्चेतील नाव की मोदींचे धक्कातंत्र !
PM Narendra Modi Sarkarnama

पुणे : विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाची मुदत २४ जुलैला संपत असल्याने नव्या राष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रक्रिया सुरू होताच राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या दोन्ही पदांसाठी नावांची चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. चर्चेतल्या नावांचा विचार होणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेहमीच्या धक्कातंत्राप्रमाणे अन्य नावांवर शिक्कामोर्तब होणार याची उत्सुकता लागली आहे.

PM Narendra  Modi
राजकीय समीकरणांना वेग! पवार, ठाकरे अन् फडणवीसांनी हाती घेतली सूत्रे

विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केरळचे राज्यपाल अरिफ महमंद खान, छत्तीसगडच्या राज्यपाल अनूसुया उईके यांची राष्ट्रपतीपदासाठी तर केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी तसेच सुमित्रा महाजन यांच्या नावाची उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चा आहे. मात्र, राष्ट्रपतीपदासाठी यापैकी कुणाचे नाव अंतीम होणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेहमीच्या धक्कातंत्राप्रमाणे यापेक्षा नवीच नावे समोर येतात याचीही चर्चा सुरू झाली आहे.

PM Narendra  Modi
राज्यसभेसाठी 'मविआ'ची सावध पावलं; डमी मतपत्रिकेतुन आमदारांना मार्गदर्शन

गेल्यावेळी वेगवेगळी नावे चर्चेत होती. मात्र, अचानकपणे तेव्हाचे बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे यावेळीदेखील चर्चेतील नाव अंतीम होणार की अचानकपणे आणखी नवे नाव समोर येणार याचीच चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. राष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपराष्ट्रपतीपदाची निवड प्रकिया होणार असली तरी उपराष्ट्रपती कोण याचीही चर्चा जोरात सुरू आहे.

PM Narendra  Modi
पंकजा मुंडेंच्या संतप्त कार्यकर्त्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या दोन्ही पदांवर नावांचा विचार करताना उत्तर भारत, दक्षिण भारताचा विचार करावा लागणार आहे. शिवाय महिला, दलित, आदिवासी, मुस्लीम असा विचारदेखील करावा लागेल, असे राजकीय तज्ञ सांगत आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाबरोबर शिवसेना, अकाली दल, तेलंगणा राष्ट्र समिती यासारखे महत्वाचे पक्ष होते. यावेळी भाजपाला आणखी काही नवे मित्र जोडावे लागणार आहेत.

राष्ट्रपतीपदासाठी मतदान घेण्याची वेळ आल्यास १८ जुलै मतदान होणार असून २१ जुलैला मतमोजणी होणार आहे. २४ जुलैला विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत संपत आहे. या निवडणुकीसाठी १५ जूनला अधिसूचना काढली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in