अडचणीतील राष्ट्रवादीसाठी दिलीप वळसे पाटील संकटमोचक बनले!

न मागता अत्यंत महत्त्वाचे खाते मिळणारे वळसे पाटील हे राज्यातील एकमेव मंत्री आहेत.
Atul Benke
Atul BenkeSarkarnama

मंचर (जि. पुणे) : “राज्य सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढे जेव्हा जेव्हा अडचणी उभ्या राहतात. तेव्हा तेव्हा संकटमोचक म्हणून दिलीप वळसे पाटील उभे राहतात. न मागता अत्यंत महत्त्वाचे खाते मिळणारे वळसे पाटील हे राज्यातील एकमेव मंत्री आहेत. यावेळीही त्यांना न मागता गृहमंत्रीपद मिळाल्याचे राज्यातील जनतेने पहिले आहे. ते माझे आधारस्तंभ आहेत, त्यांच्या कामाची पद्धत आमच्यासारख्या नवोदित आमदारांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारी आहे,” असे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले. (Whenever the NCP got in trouble, Dilip Walse Patil came running for help)

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिर सांगता समारंभ व गरजू मुलांना शालेय साहित्य वाटपप्रसंगी बेनके बोलत होते. या वेळी आमदार नीलेश लंके, आमदार सुनील शेळके, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, बाळासाहेब बेंडे, देवदत्त निकम, वसंतराव भालेराव, विनायक तांबे, डॉ.अंबादास देवमाने, अरुणा थोरात, सुषमा शिंदे, उषा कानडे, अरविंद वळसे पाटील, ऋषिकेश गावडे, सरपंच नवनाथ निघोट उपस्थित होते.

Atul Benke
भरणे म्हणतात, ‘माझ्याकडे डावाला प्रतिडाव’...आता हर्षवर्धन पाटील कोणता नवा डाव टाकणार?

बेनके म्हणाले “ऊर्जा खाते अडचणीत होते. भारनियमाने जनता त्रस्त झाली होती, त्यावेळीही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वळसे पाटील यांच्याकडे उर्जा खाते सोपविले होते. उर्जा खात्याची प्रतिमा त्यांनी उंचाविली. त्याप्रमाणेच गृहखात्याचीही कामगिरी समाजाभिमुख करून पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धैर्य वाढवण्याचे काम करतील. सलग सात वेळा ते वाढत्या मताधिक्याने आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी मतदारसंघाचा नियोजनबद्ध विकास केला आहे. वळसे पाटील यांच्या गैरहजेरीतही देवेंद्र शहा व बाळासाहेब बेंडे हे व्यवस्थित नियोजन करून जनतेची कामे करतात. त्यामुळे आरोग्य, शिक्षण व अन्य पायाभूत सुविधांमध्ये हा मतदार संघ अग्रेसर आहे.”

Atul Benke
संतोष जगताप खून प्रकरणाच्या मास्टर माईंडला अटक; पाटसमधील एका व्यक्तीवरही संशय

लंके म्हणाले “राज्यात अनेक सरकारी हॉस्पिटल पहिली; पण मंचर उपजिल्हा रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा पाहून भारावून गेलो. वळसे पाटील हे मॅनेजमेंट गुरु आहेत. पारनेर तालुक्यात शेतीसाठी पाणी व्यवस्था करण्यात वळसे पाटील यांचे योगदान आहे. पारनेरची जनता त्यांना देवाप्रमाणे मानते.” शेळके म्हणाले की काम करत असताना वळसे पाटील पक्ष पाहत नाहीत. समान न्याय देतात. चुकीच्या कामांना त्यांच्याकडे थारा नसतो.

एक कोटीच काय चार कोटी देईन

मंचरजवळ तांबडेमळा गोरक्षनाथ टेकडी परिसरात १२० कोटी रुपये खर्च करून २०० बेडचे हॉस्पिटल दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांतून लवकरच होणार आहे. आमदार अतुल बेनके यांनी आमदार निधीतून एक कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी देवेंद्र शहा यांनी केली होती. हा धागा पकडून बेनके म्हणाले “वळसे पाटील यांनी सांगितल्यानंतर आमदार निधीतून एक कोटीच काय मी चार कोटी रुपयेही देईल. कारण, जुन्नर तालुक्यातील रुग्णांना येथे चांगल्या आरोग्य सुविधा मिळतात.”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com