जेव्हा जयंत पाटील विचारतात, ``काका चव्हाण तुम्हाला काय म्हणाले?`` - When Jayant Patil asks; what did kaka Chavan tell you | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

जेव्हा जयंत पाटील विचारतात, ``काका चव्हाण तुम्हाला काय म्हणाले?``

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 जून 2021

बूथ कमिट्या सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधानसभानिहाय बूथ कमिट्यांच्या आढावा बैठका सुरू झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पुण्यातील काही मतदारसंघाचा आढावा घेतला. बूथनिहाय कमिटीतील सदस्य काम करीत आहे की नाही याची माहिती त्यांनी थेट सदस्यांना फोन करून घेतली. माजी नगरसेवक काका चव्हाण अध्यक्ष असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील बूथ कमिटी सदस्यांना फोन करून सुरू असलेल्या कामाचा आढवा पाटील यांनी घेतला.(When Jayant Patil asks; what did kaka Chavan tell you) 

बूथ कमिटी या पक्षाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे यापुढील काळात बूथ कमिट्या सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले. बूथ कमिट्या सक्षम करणे हे यापुढील महत्वाचे काम असल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्यभरात प्रत्येक मतदासंघात बूथनिहाय आढावा घेण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षांच्या माध्यमातून हे काम करण्यात येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची खरी ताकद पश्‍चिम महाराष्ट्रात आहे. या भागातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सक्रिय आहे. तळागाळात पक्षाची ताकद आहे. त्यामुळे पक्षाचा भर सुरवातील या पाच जिल्ह्यातील बूथ कमिट्या अधिक सक्षम करण्यावर राहणार आहे. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण व मुंबई शहरातील मतदारसंघांचा आढावा घेण्याचे नियोजन पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

येत्या काळात राज्यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायत व महाापलिकांच्या निवडणुका आहेत. या सर्व निवडणुका म्हणजे पुढच्या विधानसभेची तयारीच मानली जाते. त्यामुळे या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी बूथ कमिट्यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. त्यामुळे बूथ कमिट्या सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादीचे कंबर कसली आहे. बूथ कमिट्यांचा आढावा विधानसभा अध्यक्ष घेणार असले तरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यभरातील मतदारसंघांच्या आढाव्यावर लक्ष ठेवून राहणार आहे. शेवटच्या टप्प्यात ते राज्याचा दौरादेखील करणशर आहेत.

Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख