Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao PatilSarkarnama

'तहसीलदार रात्री घाबरत; तर पोलिस अधिकारी हे कोणी नसल्याचे पाहूनच भेटायला यायचे!'

मी पहिल्यांदा खासदार झाल्यावर अधिकाऱ्यांना मला भेटू दिलं जात नव्हतं : आढळराव

पुणे : लोकसभेच्या २००४ च्या निवडणुकीत जेव्हा पहिल्यांदा उभा राहिलो आणि निवडून आलो. तेव्हा आंबेगाव तालुक्यातील अधिकाऱ्यांना मला भेटू दिलं जायचं नाही. कारण, त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती. पण, तहसीलदार आणि पोलिस अधिकारी हे रात्री-अपरात्री घाबरत घाबरत मला भेटायला यायचे. ते सांगायचे की आमच्यावर बंधनं आहेत, तुम्हाला भेटण्याची आम्हाला परवानगी नाही. मंचर पोलिस ठाण्याचे निरीक्षक तर मला भेटायला येण्यापूर्वी ते त्यांची बंदोबस्ताची गाडी पाठवायचे. लांडेवाडीच्या शिवेपर्यंत कोणी नाही ना हे पाहायचे, त्यानंतरच ते मला भेटायला बंगल्यात यायचे, असा माझा संघर्ष होता, असे शिवसेनेचे माजी उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी सांगितले. (When I first became an MP, officials were not allowed to meet me : Shivajirao Adhalrao)

आढळराव यांनी सोमवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आपल्या तातडीने बोलविण्याचे कारण काल दुपारपासून सर्व माध्यमांमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात बातमी फिरत होती. बहुतांश लोकांनी अभिनंदन केले, अगोदर सांगितले असते तर आम्हीही आलो असतो, असे काहीजण म्हणाले. जवळजवळ १८ ते १९ वर्षे तुमच्यासोबत काम करत आहे. या वर्षात हिंदुह्‌दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार कधी सोडला नाही. हिंदुत्वाच्या विचारापासून कधीही लांब गेलो नाही. अनेक संकटं आली. माझी अठरा वर्षांची कारकिर्द फक्त आणि फक्त संघर्ष करण्यातच गेली.

Shivajirao Adhalrao Patil
'पवारसाहेब, मी घरी बसतो; पण विधानसभेला वळसे पाटलांनाही घरी बसवा!'

निधीवाटप असेल. पोलिस अणि तहसील कार्यालयात करावा लागणार संघर्ष असेल. शिवसैनिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला कायम मैदानात उतरावे लागत असे. मी खासदार असताना आणि नसतानाही अजूनही मी शिवसैनिकांसाठी लढत आहे. मला आजही वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात १० फोन करावे लागतात. शिक्रापूर, रांजणगाव, मंचर, घोडेगाव, चाकण, आळेफाटा, ओतूर या पोलिस ठाण्यात फोन करून आमच्या शिवसैनिकांवर खोटी केस दाखल केली आहे, त्यांना त्रास होतो आहे, तडीपार केले आहे, असे सांगत असायचो. हे मी माझ्या शिवसैनिकांसाठी करत होतो, माझ्यासाठी काही नव्हतं. निदान गेल्या तीन साडेतीन वर्षांंमध्ये एका बाजूला माझे पाठीचे दुखणं, डायबेटीस असतानाही मी घरात बसून राहिलो नाही. ज्यांनी कामं करायला पाहिजेत, त्यांनी कामं केली नाहीत. पण, मला मतदारसंघ वाऱ्यावर सोडता आला नाही. मी लोकांचे प्रश्न घेऊन कधी वादळात नुकसान झालेल्या लोकांना खिशातून पैसे काढून मदत केली, असेही आढळराव यांनी नमूद केले.

Shivajirao Adhalrao Patil
राजन पाटलांचं अखेर ठरलं : दोन तारखेला भाजपत प्रवेश, बाळराजेंना विधान परिषदेचा शब्द!

राज्यात सत्तांतर झाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचे पाहून आम्हाला समाधान वाटले. आता आमच्या आणि शिवसैनिकांच्या जीवनाला कुठंतरी आधार आणि स्थैर्य मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढण्याची ताकद मिळेल. पण दुर्देवाने, ज्यांच्याविरोधात मी सर्वस्व पणाला लावून संषर्घ केला, त्यांच्याबरोबर सरकार स्थापन झालं. आम्ही समजून घेतलं, काही हरकत नाही. निदान आम्हाला आमचा वाटा मिळेल, आमची कामे होतील, आमच्या शिवसैनिकांना त्रास कमी होईल. पण, दुर्दैवाने तसं काहीही झालं नाही. तरीही आम्ही कसलीही तक्रार केली नाही. गावोगावच्या शिवसैनिकांना त्रास व्हायला लागला. मुख्यमंत्री आमच्या शिवसेनेचे असूनही शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल व्हायचे. मी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना सांगत होतो की साहेब असं होतंय बघा. मध्यंतरी आंबेगाव तालुक्यातील आमोंडीतील एका मंदिरात लोक पूजा करायला गेले, तर पोलिसांनी त्यांना काठीने मारहाण केली. उद्धवसाहेबांना मी बोललो, मेसेज पाठवला. त्यावेळी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी त्या ठिकाणी आले. मला वाटलं आता बरं झालं. पण पुढं काहीच झालं नाही, अशी खंतही माजी खासदार आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com