Kasba By-Election : काँग्रेसने काय जादू केली की, नाराज असलेले बागवे पिता-पुत्र प्रचारात सक्रिय झाले?

Kasba By-Election : बागवे पिता - पुत्र पुन्हा सक्रिय!
Kasba By-Election
Kasba By-Election Sarkarnama

Kasba By-Election : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत अनेक राजकीय नाट्य घडत आहेत. टिळक कुटुंबियांना उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. त्याप्रमाणे काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, काँग्रेसचे निष्ठावंत बाळासाहेब दाभेकर हे नाराज झाले व बंडखोरी करतअपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला. मात्र यासोबतच काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींमुळे काँग्रेसचे नेते व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे व त्यांचे पुत्र अविनाश नाराज असल्याची चर्चा होत होती. मात्र आता त्यांची ही नाराजी दूर झाल्याचे दिसून येत आहे.

Kasba By-Election
Pune News : अविनाश बागवे भाजपच्या वाटेवर ? ; 'हे' आहे बागवे पिता-पुत्रांच्या नाराजीचे खरे कारण !

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात रविवारी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नगरसेवक रशीद शेख यांनी भाजपातून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान रशीद शेख भाजपात दाखल झाले होते.

ज्या रशीद शेख यांच्यामुळे 2019 च्या निवडणुकीत बागवे यांचा साडेपाच हजार मतांनी पराभव झाला त्यांना पक्षात घेऊ नये, अशी भूमिका बागवे यांनी घेतली. मात्र ऐनवेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि प्रवेश घेण्यात आला. बागवे हे गेली सुमारे पाच वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते.

Kasba By-Election
Pune By-Election : कसबा-चिंचवडसाठी राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची फौज जाहीर!

मात्र आता बागवे यांनी यांची नाराजी दूर झाली असून ते काँग्रेसच्या कार्यात पुन्हा ते रूजू झाले आहेत.कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी ते जोरदार प्रचार करताना दिसले. काँग्रेसच्या कार्यात ते पुन्हा सक्रिय झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com