एकाच मुख्यमंत्र्याला एकच प्रश्न सलग तीस दिवस विचारण्याचा विक्रम!

मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी पुण्यात विधान भवनात मंगळवारी पुणे विभागातील अतिवृष्टी, पीक पेरणी आणि विकास कामांचा आढावा घेतला.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

पुणे : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक महिना पूर्ण झाला. एक महिन्याचा कालावधीत माध्यम प्रतिनिधींनी त्यांना सर्वाधिक वेळा विचारलेला प्रश्‍न होता मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार? त्यावर मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी विस्तार लवकरच होईल, हे दिलेले उत्तर सर्वाधिक वेळा त्यांच्या मुखातून बाहेर आले आहे.

Eknath Shinde
सरकारला पूरग्रस्तांची चिंता नाही : विरोधी पक्षनेते अजित पवारांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री शिंदे आज पुणे दौऱ्यावर होते. आजच्या पत्रकार परिषदेतदेखील त्यांना हाच पहिला प्रश्‍न विचारण्यात आला. त्याला विस्तार लवकरच होईल, असे नेहमीचेच उत्तर शिंदे यांनी दिले. एक जूनला मुख्यमंत्री म्हणून शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. अपात्रतेची टांगती तलवार असल्यानेच मंत्रीमंडळाचा विस्तार केला जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना वारंवार हाच प्रश्‍न विचारला जात आहे. त्यावर त्यांच्याकडून लवकरच विस्तार होईल, असे गुळमुळीत उत्तर देण्यात येत आहे.

Eknath Shinde
असलम शेख यांच्यानंतर कॉंग्रेसचा मोठा नेता फडणवीसांच्या भेटीला

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारला काहीसा विलंब होत असला तरी सरकार चांगल्या प्रकारे चालले आहे की नाही?, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांनाच केला. मंत्रीमंडळ विस्ताराच्या प्रश्‍नांना या काळात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनीही बगल दिल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने विकास कामांना गती द्यावी तसेच सरकारी फायलींचा प्रवास कमी करा, अशा स्पष्ट सूचना बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde
'उपमुख्यमंत्री फडणवीसांवर कुठलीच जबाबदारी नाही, प्रत्येक फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाते'

मुख्यमंत्री शिंदे यांनी येथील विधान भवनात मंगळवारी पुणे विभागातील अतिवृष्टी, पीक पेरणी आणि विकास कामांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शिंदे म्हणाले, ‘‘ आढावा बैठकीत प्रशासनाला केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने सुरू असलेल्या विकासकामांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमधील शासन स्तरावर प्रलंबित कामाला गती देऊन नागरिकांना योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी अधिक चांगला परफॉर्मन्स द्यावा. विकास कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांबाबत प्रशासनाने पावले उचलावीत.’’

Eknath Shinde
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यात उशीरापर्यंत लाऊडस्पीकर ; पोलिसात तक्रार दाखल..

पुणे विभागातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज, धरणातील पाणीसाठा, कोरोनाची सद्यःस्थिती, बुस्टर डोस याचा आढावा घेतला आहे. केंद्र सरकारशी संबंधित असलेले प्रकल्प आणि अन्य प्रश्नांच्या यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा राज्याला झाला पाहिजे. पंतप्रधान आवास योजनेतील पुणे शहरातील उद्दिष्ट केवळ ६५ टक्के पूर्ण झाले आहे. प्रशासनाने ते काम तातडीने पूर्ण करावे. केंद्र सरकारच्या काही योजनांमध्ये विलंब झाला आहे का, याचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. विभागातील पाच जिल्ह्यांमधील प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे काम केले जाणार आहे. विकास कामांचे 'थर्ड पार्टी' ऑडिट करण्यावर भर असणार आहे. त्याबद्दल सूचना दिल्या आहेत.

वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकास आराखड्यातील कामांना कोणत्याही प्रकारची स्थगिती दिलेली नाही.शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची योजना थांबली होती, ती कार्यान्वित केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ नियोजित जागेवरच होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्या घरात छाप्यात मिळालेल्या रकमेवर 'एकनाथ शिंदे, अयोध्या दौऱ्यासाठी' असे आढळून आल्याची चर्चा आहे. या संदर्भात विचारले असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "ईडीच्या छाप्यात रक्कम कोणाच्या घरात आढळली, त्यांनाच हा प्रश्न विचारा.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in