By Election : चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीत आतापर्यंत काय-काय घडलं? दोन गटात हाणामारी ते...

Pune News : चिंचवडमध्ये मतदानास गालबोट; दोन गट भिडले
By Election
By ElectionSarkarnama

Pune Bypoll election : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान आज पार पडत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत चिंचवडमध्ये फक्त 20.68 टक्के तर कसब्यात केवळ 18.5 टक्के मतदान झाल्याने आश्चर्च व्यक्त करण्यात येत आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचे मतदान अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सकाळपासून काय-काय घडामोडी घडल्या? याबाबतची माहीती थोडक्यात पाहूयात...

By Election
By Election : दुपारपर्यंत चिंचवडमध्ये 20 तर कसब्यात फक्त 18 टक्के मतदान; मतदारांमध्ये निरुत्साह, कारण काय?

या उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

- कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी पहिल्या टप्प्यातच त्यांनी मतदान केलं. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी सकाळी दगडूशेठ गणपतीची आरती करून मतदान केले.

- चिंचवड विधानसभा क्षेत्रातील चिंचवडचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

जगताप आणि कलाटेंच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट

- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीला गालबोट लागले. दोन गटात धक्काबुक्की झाली. अपक्ष उमेदवार कलाटे आणि जगताप यांच्या समर्थकांमध्ये हा वाद झाला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे वाद मिटला. त्यानंतर येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे.

By Election
Chinchwad Bypoll Election : चिंचवडमध्ये मतदानास गालबोट ; दोन गट भिडले

धंगेकरांचा भाजपवर आरोप-

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मतदानात पैशाचा आणि पोलीस यंत्रणांचा वापर भाजपकडून होत असल्याचा आरोप केला. त्यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले.

रासनेंकडून आचारसंहिता शिस्तीचा भंग?

भाजप उमेदवार हेमंत रासने अडचणीत येण्याची शक्यता आहे. हेमंत रासने यांनी थेट मतदान केंद्रात पक्षचिन्ह असलेला रुमाल वापरला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आचारसंहिता शिस्तीचा भंग झाल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

By Election
Kasba By Election : राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील-ठोंबरेंनी ‘त्या’ फोटोबाबत दिले ‘हे’ स्पष्टीकरण

मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल?

मतदारांकडून ईव्हीएम मशीनवर असलेल्या चिन्हा समोरील बटण दाबून मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेचा भंग होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.

अनेक जण मतदानापासून वंचित?

- कसबा पेठ पोटनिवडणूक अनेक कारणामुळे चर्चेत आहे. मतदार यादीत नाव नसल्याने काही ठिकाणी मतदारांना मतदान करता आले नाही. तर काही मतदार याद्यांमध्ये मयतांची नावे आहेत. त्यामुळे अनेकांना मतदानाचा अधिकार बजावण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

By Election
Kasba Peth Bypoll Election : नावे गायब, अनेक जण मतदानापासून वंचित ; यादीत मयतांची नावे..

रूपाली ठोंबरेंवर गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप

कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी मतदान करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्या प्रकरणी त्यांनी गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. मात्र, मी अजून मतदानच केलेले नाही, त्यामुळे मी कोणत्या कायद्याने गुन्हेगार होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

एक वाजेपर्यंत किती टक्के मतदान :

- कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान संथगतीने पार पडत आहे. सकाळी सातपासून दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे. कसब्यात दुपारी एक वाजेपर्यंत 18.50 टक्के, तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदान झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com