एमपीएससी परीक्षेसाठी पुण्यात येणाऱ्या 50 हजार विद्यार्थ्यांची सोय काय? 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने पुढच्या दोन महिन्यांत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी राज्यभरातून सुमारे 50 हजार विद्यार्थी पुण्यात येणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची आवश्‍यक सुविधांसह सोय करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
What is the facility for 50,000 students coming to Pune for MPSC exam?
What is the facility for 50,000 students coming to Pune for MPSC exam?

पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने पुढच्या दोन महिन्यांत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी राज्यभरातून सुमारे 50 हजार विद्यार्थी पुण्यात येणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची आवश्‍यक सुविधांसह सोय करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

राज्याच्या विविध भागांतून विद्यार्थी या परीक्षांसाठी येणार आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुण्यात यावे लागणार असल्याने प्रशासनाला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. 

पुणे हे स्पर्धा परीक्षेचे राज्यातील प्रमुख केंद्र आहे. सुमारे दीड ते दोन लाख विद्यार्थी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी पुण्यात राहून विद्यार्थी करत असतात. यातील काही विद्यार्थी परीक्षेसाठी आपल्या सोयीने आपापल्या जिल्ह्यातील केंद्र निवडतात. तरीही पुण्यात परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पन्नास हजारांच्या जवळपास असते.

येत्या 13 सप्टेंबर रोजी राज्य सेवेची पूर्व परीक्षा आहे. याशिवाय, ता. 13 ऑक्‍टोबरला अराजपत्रित संयुक्त पूर्व करीक्षा होणार आहे. या दोन्ही परीक्षेसाठी सुमारे पन्नास हजार विद्यार्थ्यांनी पुणे केंद्र निवडले आहे. या दोन्ही परीक्षांसाठी पुण्यात येण्याची, तसेच परीक्षा देऊन परत जाण्यासाठी प्रवासाची अडचण येणार आहे. 

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत एसटी महामंडळाची सेवा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे पुण्यापर्यंत प्रवास कसा करायचा? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसमोर आहे. पुण्यात आल्यानंतर परीक्षेसाठी किमान एक मुक्कम करावा लागणार आहे. या मुक्कामाची व्यवस्था कशी होणार, हा विद्यार्थ्यांसमोरचा प्रश्‍न आहे. 

या पार्श्‍वभूमीवर पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यात येतील, असे प्रशासन सांगत असले तरी नेमकी काय सुविधा देणार याबाबत संभ्रम आहे. गावोगावी वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांनाही पुण्यात पोचण्याची व एक दिवसासाठी का होईना राहण्याची काय व्यवस्था होईल, याबाबत काळजी लागून राहिली आहे. 

हेही वाचा : यूपी पोलिसांना मोकळीक; बिहारचा अधिकारीच क्वारंटाईन का? 

मुंबई : उत्तर प्रदेशातील गुंड विकास दुबेच्या प्रकरणात महाराष्ट्रात आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन केले गेले नाही, मग अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात तपासासाठी आलेल्या बिहारच्या पोलिस अधिकाऱ्याला क्वारंटाइन कसे करण्यात आले? असा सवाल केंद्र सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. 

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या वार्तांकनाबाबत न्यायालयाने प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि न्यूज ब्रॉड कास्टर्स असोसिएशनला नोटीस बजावली आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येचा तपास सीबीआय किंवा एसआयटीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या दोन जनहित याचिकांवर शुक्रवारी (ता. 7 ऑगस्ट) दूरचित्रसंवादाद्वारे सुनावणी झाली. नागपूरमधील समित ठक्कर आणि कोलकातामधील वकील प्रियांका तिबेरवाल यांनी या दोन याचिका दाखल केल्या आहेत. 

सध्या सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरू असल्याने मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने याचिकेवरील सुनावणी 21 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी खंडपीठाला याबाबत माहिती दिली. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com