चंद्रकांत पाटील यांच्याशी अमित शाह काय बोलले ?

आज झालेल्या भेटीत राज्यातील साखर कारखानदारीच्या संदर्भाने शाह यांच्याशी पाटील यांची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याशी अमित शाह काय बोलले ?
अमित शाह-चंद्रकांत पाटीलसरकारनामा

पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पाटील यांच्या भेटीने राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ लावण्यात येत असले तरी पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी ही भेट झाल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात येत आहे.

पाटील यांनी राज्यातील महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भाने शाह यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून पक्षातील काही संघटनात्मक बाबीवर पाटील यांनी शाह यांना माहिती दिली आहे.

अमित शाह-चंद्रकांत पाटील
ठाकरे सरकार घरात लपले; तेव्हा कोरोनाच्या कडेलोटातून केंद्राने सावरले

आधी जाहीर केल्याप्रमाणे शाह यांचा २६ व २७ नोव्हेंबरला पुणे व नगरच्या दौरा ठरला होता. मात्र, चार-पाच दिवसांपूर्वी हा दौरा अचानक स्थगित करण्यात आला. डिसेंबर महिन्यात शाह पुन्हा पुण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असून या दौऱ्याबाबतही या भेटीत चर्चा झाली आहे.

अमित शाह-चंद्रकांत पाटील
...ही तर जनतेसाठी महात्रासाची दोन वर्षे !

केंद्रात सहकार विभागाची निर्मिती झाल्यानंतर शाह यांचा हा पहिला पुणे दौरा ठरणार आहे. देशात सहकारचे सर्वात मोठे जाळे राज्यात आहे. मुख्यत: राज्यातील बहुतांश साखर कारखानदारी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने शाह यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे.

आज झालेल्या भेटीत राज्यातील साखर कारखानदारीच्या संदर्भाने शाह यांच्याशी पाटील यांची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्याने पाटील राज्यातील महाविकास आघाडीच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत.राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रात पाटील यांचा वावर अधिक असून राष्ट्रवादीच्या विरोधात ते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.त्यामुळे पाटील यांची शाह यांच्याशी झालेल्या भेटीला विशेष महत्व आहे.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in