Kasaba By Election: पेठांमधल्या १६ नगरसेवकांनी काय केलं? भाजपकडून शोध सुरु...

Corporators in Peth: कसबा पेठेत भाजपचे सोळा नगरसेवक आहेत.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Kasaba Election News: कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे कसबा पेठेत भाजपच्या गिरीश बापट, मुक्ता टिळक यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या प्रभाव होता. पण आतापर्यंत भाजपचा बालेकिल्ला असणारा कसबा पेठ नेमका याच वेळी भाजपने कसा गमावला. तसेच, या निवडणुकीतील पराभवाचा आता भाजपने शोध सुरु केला आहे. (What did 16 corporators in Peth? BJP starts searching...)

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघातील सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, कसबा पेठेतील भाजपचे मताधिक्य प्रामुख्याने घटल्याचे या निकालातून समोर आले. विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे स्वत: महापालिकेत या पेठ भागाचे प्रतिनिधीत्व करत होते. कसबा विधानसभा मतदार संघात शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ- सोमवार पेठ, रास्ता पेठ-रविवार पेठ, खडकमाळ आळी, महात्मा फुले पेठ, लोहियानगर- कासेवाडी या महापालिकेच्या सहा प्रमुख प्रभागांचा समावेश आहे.

Devendra Fadnavis
Sanjay Raut News: संजय राऊत हक्कभंग समितीला उत्तर देणार की...?

या सहा प्रभागात भाजपचे सोळा नगरसेवर, शिवसेनेचे दोन आणि कॉंग्रेसचे चार नगरसेवक आहेत. या प्रभागात सर्वाधिक सोळ नगरसेवक भाजपचे असतानाही आणि हे सर्वच्या सर्व हेमंत रासनेंच्या प्रचारात होते. पण तरीही या पेठ भागातील हक्काची मतेही रवींद्र धंगेकरांना मिळाल्याने भाजपच्या नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर आणि प्रचारातील सक्रिया सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

तर दुसरीकडे, पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपमधील अंतर्गत मतभेदही अनेकदा चव्हाट्यावर आले. कसब्यातील सोळा नगरसेवकांपैकी बहुतांश आमदार हे गिरीश बापट यांचे समर्थक आहेत. पण गिरीश बापट त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव प्रचारात दिसले नाहीत. याशिवाय कसब्यात ब्राह्मण उमेदवार देण्यावरुनही भाजपमध्ये बरेच मतभेद समोर आले होते. त्यामुळे हे नगरसेवक रासनेंच्या प्रचारात दिसले असले तरी आता त्यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

Devendra Fadnavis
Nashik News; `कसबा` विजयाने शिवसेना काँग्रेसच्या दारात!

पोटनिवडणुक जाहीर झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांनी जोमाने कामाला लागण्याच्या सुचनाही दिल्या होत्या. तसेच, भाजपला मताधिक्य न मिळाल्यास आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवकांचा विचार करणार नाही, असा इशाराही त्यांनी एकप्रकारे दिला होता. त्यामुळे आता कसब्यातील भाजपच्या या सोळा नगरसेवकांचे भवितव्यही पणाला लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in