Sushma Andhare News: देवेंद्र फडणवीसांना कुठल्या गुन्ह्यांची भीती वाटतेय? सुषमा अंधारेंचा सवाल

Sushma Andhare On Devendra Fadnavis : ''फडणवीसांनी काही केलं नाही तर त्यांना भीती कशाची वाटते?''
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama

Maharashtra Politics : ''देवेंद्र फडणवीस यांना नेमकी कुठल्या गुन्ह्यांची भीती वाटतेय, तुम्ही काय केलं आहे की ज्याची तुम्हला भीती वाटते?'', असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. सुषमा अंधारे या आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी हे भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात आत टाकण्याचा डाव होता, असा आरोप केला होता. त्या आरोपांवर बोलताना सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे.

Sushma Andhare
Chandrasekhar Bawankule : भाजपचे ठरले, टोपेंच्या विरोधात विधानसभेला घाडगे..

सुषमा अंधारे म्हणाल्या, ''मुख्यमंत्र्यांना किती अधिकार असतात हे देवेंद्र फडणवीस यांना जास्त माहित आहे. ज्या वेळी मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) होते तेव्हा त्यांनी फडणवीसांना आत टाकलं नाही. पण फडणवीसांनी काही केलं नाही तर त्यांना भीती कशाची वाटते? त्यांनी असा कुठला गुन्हा केला आहे'', असा सवाल उपस्थित करत ''उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना काहीही कटकारस्थान केलं नाही. शिवसेना (Shivsena) ही भाजपसारखी कटकारस्थान करणारी नाही'', असं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.

Sushma Andhare
Devendra Fadanvis : आपल्या 'या' लाडक्या आमदारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केली वाट वाकडी

''शिवसेनेला कधीच कपटी राजकारण करत नाही.शिवसेनेत जे दिसतं तेच शिजत असतं. पण केंद्रीय यंत्रणा ह्या भाजपच्या हातात असताना अनिल देशमुखांना कोणी आतमध्ये टाकलं? तसेच या प्रकरणात न्यायालयाने सीबीआयला फटकालंही होतं.

संजय राऊतांना (Sanjay Raut) कोणी आतमध्ये टाकलं? हे सगळं कुणी केलं? प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) जेव्हा महाविकास आघाडीत होते, त्यावेळी त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा कोणी लावला होता?'', असे सवाल यावेळी सुषमा अंधारे यांनी केले.

Sushma Andhare
Santosh Bangar News : सरकारमध्ये असलो म्हणून काय आम्ही बांगड्या भरल्यात का ?

''त्यावेळी सुरू असणारे सर्व तपास आता का थांबले? या सर्व गोष्टीचे उत्तर देवेंद्र फडणवीसच उत्तर देऊ शकतात. न्यायालय सर्वोच्च आहे की किरीट सोमय्या? सोमय्यांकडे हे बळ कुठून येतं?, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी भाजपच्या नेत्यांवर केला. तसेच काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी कबूल केलं होतं की, मी बदला घेतलाय. मग देवेंद्रजी तुम्ही सुडाचे राजकारण करण्यात माहीर नाहीत का?'' असा सवाल करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com