राज ठाकरेंचे कोणते आंदोलन यशस्वी झाले सांगा ?

राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोणी बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
राज ठाकरेंचे कोणते आंदोलन यशस्वी झाले सांगा ?
Ajit Pawar- Raj ThackeraySarkarnama

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर टोल बंद आंदोलन झाले. त्याचे पुढे काहीही झाले नाही. हॉकर्स, टॅक्सीवाल्यांना मारहाण झाली. ‘परप्रांतीयांनो यूपी बिहार चले जाव’ आंदोलन झाले. बांधकामे बंद पडल्यानंतर पुन्हा त्या मजुरांना आणून कामे करावी लागली. आत्तापर्यंतची त्यांची ही सगळी आंदोलने अपयशी ठरली आहेत,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर तोफ डागली.

Ajit Pawar- Raj Thackeray
'ग्लोबल टीचर' डिसलेंचा पाय खोलात; जिल्हा परिषदेनेच केला गुरुजींच्या निषेधाचा ठराव

पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगामाच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी अजित पवार बोलत होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याबाबत अल्टिमेटम दिला होता. या संदर्भात पवार म्हणाले, ‘‘ राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोणी बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. भोंग्याबाबत कोणीही किती ‘अल्टिमेटम’ द्यावेत, आम्ही अजिबात ऐकणार नाही. ‘हम करेसो कायदा’ हे चालणार नाही. काही नेते गॅलरीत बसून हातवारे करतात. परंतु नोटिसा कार्यकर्त्यांना जातात, धरपकड होते. आपला देश आणि महाराष्ट्र सर्वांचा आहे, हे त्यांनी समजून घ्यावे. सध्या महागाई आणि इतर प्रश्न महत्त्वाचे आहेत हे लक्षात घ्यावे.’’

Ajit Pawar- Raj Thackeray
कोल्हापूर उत्तरवर शिवसेनेचा दावा कायम राहणार; संजय राऊतांचे सूचक वक्तव्य

पवार म्हणाले, ‘‘ ध्वनि प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. कुणाला हनुमान चालिसा म्हणायची असेल तर दुसऱ्याच्या दारात कशाला, आपल्या घरात म्हणावी. कोणताही धार्मिक उत्सव, सण साजरा करताना दुसऱ्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत ध्वनिवर्धकास परवानगी असून, त्याचे बंधन लावल्यास सर्वांचीच पंचाईत होइल. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, परंतु संविधानाच्या चौकटीत राहून वागले पाहिजे.’’

राज्य सरकार एक मेपासून साखर कारखान्यांना प्रति टनाला दोनशे रुपये साखर उतारा अनुदान आणि पाच रुपये वाहतूक अनुदान देण्यात येत आहे. संपूर्ण उसाच्या गाळपासाठी प्रयत्न सुरू आहेत. गाळप संपलेल्या क्षेत्रातील हार्वेस्टर ताब्यात घेऊन मराठवाड्यासह इतर ऊस शिल्लक असलेल्या भागात देण्यात येतील. सहकारमंत्री याबाबत दररोज आढावा घेत आहेत, असे पवार यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.