‘ज्यांची डोकी जागेवर नाहीत, असे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत’

राजगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आम्ही सोशल मीडियावरही जिंकू : दिनकर धरपाळे
‘ज्यांची डोकी जागेवर नाहीत, असे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत’
Rajgad sugar Factory ElectionSarkarnama

वेल्हे ( जि. पुणे) : "ज्यांची डोकी जागेवर नाहीत; असे उमेदवार राजगड सहकारी साखर कारखाना (Rajgad sugar Factory) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही निवडणूक म्हणजे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रंगीत तालीम आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी सात जागांसाठी ही निवडणूक कारखान्यावर लादली असून माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्या कार्यामुळे राजगड सहकारी कारखान्याची निवडणूक आम्ही सोशल मीडियावरही जिंकू," असा विश्वास राजगड सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे यांनी व्यक्त केला. (We will win election of Rajgad sugar factory on social media : Dinkar Dharpale)

भोर (Bhor) तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या काँग्रेसप्रणित (Congress) राजगड सहकार पॅनेलचा प्रचार वेल्हे तालुक्यात करण्यात येत आहे. या प्रचारादरम्यान आंबवणे येथील सभासद दौरा भेटीदरम्यान कारखान्याचे माजी उपाध्यक्ष धरपाळे हे बोलत होते.

Rajgad sugar Factory Election
रूपाली चाकणकर मंदिरात गेल्या, तेवढ्यात विद्या चव्हाणांनी व्यासपीठ सोडले; गटबाजीने पदाधिकारी हैराण!

या वेळी दिनकर धरपाळे म्हणाले की, राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल आत्ताच लागला आहे. विरोधी पक्षातील उमेदवार कोठेही फिरताना दिसत नसल्याने काँग्रेस प्रणित पॅनेलचा विजय निश्चित आहे. ही निवडणूक म्हणजे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीची रंगीत तालीम आहे.

Rajgad sugar Factory Election
‘मातोश्रीच्या खजिनदारा’चा पापाचा घडा भरलाय : रवि राणांनी डागली तोफ

यावेळी काँग्रेसचे वेल्हे तालुकाध्यक्ष नाना राऊत, सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, कारखान्याचे माजी संचालक प्रताप शिळीमकर, माजी तालुकाध्यक्ष दिलीप लोहकरे, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष आकाश वाडघरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे, वांगणीचे उपसरपंच शिवाजी चोरघे, अंबवणेचे माजी सरपंच विलास तळेकर, बबन तळेकर, ज्ञानेश्वर तळेकर, तानाजी कचरे आदींसह सभासद उपस्थित होते .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in