पुणे जिल्ह्यातील बलाढ्य शक्तीला आम्ही जागा दाखवणार : हर्षवर्धन पाटलांचा इशारा कोणाकडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वोतोपरी आमच्या पाठीशी राहणार आहेत
Vijay Shivtare-Harshvardhan Patil
Vijay Shivtare-Harshvardhan PatilSarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : पुणे जिल्ह्यात काही बलाढ्य शक्ती आहेत. त्यांना आम्ही एकत्र येऊन जागा दाखवणार आहोत, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सर्वोतोपरी आमच्या पाठीशी राहणार आहेत, असे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी इंदापुरात बोलताना सांगितले. (We will show space to the strong power of Pune district: Harshvardhan Patil)

इंदापूर येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील बोलत होते. या वेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, शेखर पाटील, कैलास कदम, गोरख शिंदे, शकील सय्यद, रघुनाथ राऊत, पिंटू काळे, मच्छिंद्र शेटे, ललेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

Vijay Shivtare-Harshvardhan Patil
अजितदादांची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला दुसऱ्या दिवशी दांडी; नाराजीची चर्चा

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र येऊन लोकशाही मार्गाने सक्षम पर्याय देणार आहोत. राज्य सरकार अतिशय मजबूत असून केंद्राची पूर्ण मदत सरकारला होत आहे. याचा उपयोग जनतेच्या हितासाठी केला जात आहे. सरकारने आपली ताकद विधिमंडळात दाखवली असून १७० पेक्षाही जास्त आमदार सरकारबरोबर असल्याने सरकारला कसलाही धोका नाही. त्याचवेळी मागचे सरकार हे अनैसर्गिक मार्गाने आलेले सरकार होते, आताचे सरकार हे जनतेच्या प्रेमातून आले आहे.

Vijay Shivtare-Harshvardhan Patil
शिवसैनिक गुंडच; पण... : विजय शिवतारेंचे विधान

माजी मंत्री शिवतारे म्हणाले की, जी कामे अडीच वर्षात झाली नाहीत, ती विकास कामे मागील तीन महिन्यांत झाली. शिंदे व फडणवीस सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने जनतेच्या हिताची कामे करत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व लोकसभेच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष व बाळासाहेबांची शिवसेना एकत्र व संपूर्ण ताकतीने लढविणार आहे.

Vijay Shivtare-Harshvardhan Patil
घसा बसलेला असूनही पवारांनी भाषण करत कार्यकर्त्यांना केले चार्ज!

गेली अडीच वर्ष महाराष्ट्रात चुकीचे सरकार होते, त्याचा मोठा फटका राज्याला सहन करावा लागला. मात्र, आता बाळासाहेबांची शिवसेना व भाजपची सत्ता आल्याने २०१९ ला जनतेने दिलेला कौल प्रत्यक्षात सत्तेवर आला आहे. हे सरकार जनतेच्या हितासाठी कार्य करत आहे. तसेच राष्ट्रवादीतील काही मंडळी नाराज असून ते स्वतःहून आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोटही शिवतारे यांनी केला. आता पुणे जिल्ह्याचे राजकारण बदलणार असून आम्ही सर्व एकदिलाने एक जीवाने काम करू व येणार पुढचा काळ हा शिवसेना-भाजपचाच असेल, असा विश्वास शिवतारे यांनी व्यक्त केला.

Vijay Shivtare-Harshvardhan Patil
शरद पवार ब्रीच कॅंडीतून थेट शिर्डीत राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दाखल

एकट्या बारामतीला २७० कोटी

मागील सरकारमध्ये शिवसेना सत्तेत असूनही निधी मिळत नव्हता, याचेच उदाहरण म्हणजे नगरोत्थन विकास निधीमधून पुणे जिल्ह्यासाठी ३७० कोटी आले होते. यापैकी पुणे शहराला १८ कोटी, सासवड शहराला पाच कोटी, जेजुरीसाठी ५० लाख, तर एकट्या बारामतीसाठी २७० कोटी रुपयांचा निधी अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतला होता, अशी टीका विजय शिवतारे यांनी केली.

विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न

सरकारने गरिबांची दिवाळी गोड व्हावी; म्हणून शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा उपक्रम राबविला. मात्र, मागील सरकारच्या काळात पोसलेले पुरवठादार यांनी जाणूनबुजून पुरवठा केला नाही, त्यामुळे गोरगरिबांना शिधा उशिरा मिळाला. त्याला जबाबदार असणाऱ्या पुरवठादराची चौकशी करण्याची मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहोत. तसेच, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानापोटी ५० हजार रुपये दिवाळीच्या पहिल्या दिवशी जमा करण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारने केले. याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक करत आहेत, असा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com