Kirit Somaiya On Girish Bapat: ‘पुण्यात भाजपचा महापौर होणार, हे आम्ही स्वप्नातही बघत नव्हतो; पण ते बापटांमुळे शक्य झाले’

गिरीश बापट यांनी अनेक कार्यकर्ते तयार केले आहेत, जे पुण्याला आणखी उंचीवर नेतील.
Kirit Somaiya -Girish Bapat
Kirit Somaiya -Girish BapatSarkarnama

Pune News: खासदार गिरीश बापट (Girish Bapat) हे जनसंघातील शेवटची पिढी होती. बापट यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात आणीबाणीनंतर झाली, त्यामुळे कोणी आमदार होणार, पुण्यात भाजपचा महापौर होणार, हे आम्ही स्वप्नातही बघत नव्हतो. मात्र, बापट यांच्यामुळे पुण्यात भाजपचा महापौर झाला, अशी भावना पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली. (We did not even dream that BJP will be the mayor of Pune; But it was possible because of Bapat)

किरीट सोमय्या यांनी बापट कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, आणीबाणीत आम्ही जनसंघाचे कार्यकर्ते तुरुंगात होतो. बाहेर आल्यानंतर भारतीय जनता पार्टी झाली. सर्वगुणसंपन्न संपूर्ण जीवन समर्पित करणारी ही पिढी एका पाठोपाठ एक जात आहे. पण, गिरीश बापट यांनी अनेक कार्यकर्ते तयार केले आहेत, जे पुण्याला आणखी उंचीवर नेतील, अशी अपेक्षाही सोमय्या यांनी व्यक्त केली.

Kirit Somaiya -Girish Bapat
Kapil Sibal News : सर्वोच्च न्यायालयानं शिंदे सरकारवर केलेल्या 'त्या' टिपण्णीनंतर सिब्बल यांचं खोचक ट्विट,काय म्हणाले ?

नवीन पिढीने गिरीश बापट यांच्याकडून शिकायला हवे. राजकीय नेत्यांनी बापट यांच्याकडून आदर्शवादी नेते म्हणून शिकायला हवे. बापट यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात आणीबाणीनंतर झाली. त्यामुळे कोणी आमदार होणार, पुण्यात भाजपचा महापौर होणार, हे आम्ही स्वप्नातही बघत नव्हतो. गिरीश बापट, प्रकाश जावडेकर, किरीट सोमय्या अथवा गोपीनाथ मुंडे असो, प्रत्येकवेळी ‘प्रधानमंत्री की अगली बारी अटलबिहारी...’ अशी घोषणा आम्ही द्यायचो, असेही सोमय्या यांनी नमूद केले.

सोमय्या म्हणाले की, आपला मतदारसंघ, आपलं पुणे देशात पुढं जावं. तसेच, बापट यांच्यासारखे नेते, ज्यामुळे भाजपने पुण्यात एक वेगळी उंची गाठली. त्यात बापट यांचे खूप मोठं योगदान आहे. काळ पुढे सरकत राहतो आणि पुढची नवीन पिढी तयार हात राहते. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्यानंतर जनसंघ संपला, असं वाटलं होतं. दिनदयाळ उपाध्य, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी प्रत्येक पिढी परिवाराला, पक्षाला, महाराष्ट्राला नवी उंची गाठून देत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान एका वेगळ्या उंचीवर गेला आहे.

Kirit Somaiya -Girish Bapat
NCP Party Workers Complain: राष्ट्रवादी काँग्रेसने निष्ठा नसलेल्यांवर प्रेम करणे थांबावावे!

संजय राऊत म्हणत होते ती हीच दंगल का?

संजय राऊत म्हणत होते की आता दंगे सुरू होणार आहेत, ते हेच दंगे आहेत का? शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या नावाने संजय राऊत सांगत होते की, दंगली सुरू होणार, त्यातील हीच ती दंगल आहे का? असा माझा महाविकास आघाडीला प्रश्न आहे, असेही किरीट सोमय्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com