सावधान : जिल्ह्यात दिवसभरात पावणे सहाशे नवे कोरोना रुग्ण

दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील १२९ नवे रुग्णांचा समावेश आहे.
सावधान : जिल्ह्यात दिवसभरात पावणे सहाशे नवे कोरोना रुग्ण
CoronaSarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे शहर, पिंपरी व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुरुवारी (ता.७) दिवसभरात ५७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी दिवसभरात ४११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात नऊ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील १२९ नवे रुग्णांचा समावेश आहे.

Corona
राज ठाकरेंचा तीन महिन्यात आठवा पुणे दौरा उद्यापासून

दिवसांतील एकूण नवीन रुग्णांत शहरातील रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ७९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३१६, नगरपालिका हद्दीतील ४२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील अकरा रुग्णांचा समावेश आहे.

Corona
कॉंग्रेस प्रदेश कार्यकारिणीत पुण्यातून बालगुडे यांना बढती; शिंदेंचाही समावेश

कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील १०७ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ६८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १८८, नगरपालिका हद्दीतील ३६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील बारा जणांचा समावेश आहे. दिवसांत पुणे शहर व पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी तीन, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन आणि नगरपालिका हद्दीतील एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसभरात कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीतील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.