
Katewadi : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. तसेच विविध ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गटासह विविध मराठा संघटनांकडून आंदोलनं, मोर्चांसह कडकडीत बंदची हाक देखील दिली जात आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती शहरासह काटेवाडी गावातही ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला गेला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावी मराठा आंदोलनावरील लाठीमाराचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी देखील कायम होते. ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत या घटनेचा निषेध केला. यावेळी बारामती शहरात मराठा समाजाच्या वतीने निघालेल्या निषेध मोर्चामध्ये काटेवाडी परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मराठा समाजाचं आंदोलन सुरू होते. यावेळी या महिलांना मारहाण झाली, ही बाब संतापजनक असून अशा घटना घडल्यास मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा दिला गेला. मराठा क्रांती मोर्चामध्ये दुफळी माजविण्याचा काही जणांचा राजकीय डाव असला तरी मराठा समाज एकसंघच असेल, असा निर्धार या प्रसंगी बोलून दाखविण्यात आला.(Manoj Jarange)
अंतरवाली सराटी (जि. जालना ) येथील मराठा आंदोलनावरील लाठीमाराचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या काटेवाडी गावी कायम होते. ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत या घटनेचा निषेध केला. यावेळी बारामती शहरात मराठा समाजाच्या वतीने निघालेल्या निषेध मोर्चामध्ये काटेवाडी परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बारामतीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने निघालेल्या मोर्चामध्ये काटेवाडी, कन्हेरी, पिंपळी, लिमटेक आदी गावातील मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. शांततेमध्ये सुरू असणाऱ्या जालना येथील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने मराठा समाजा मधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आंदोलकांवर केलेला लाठीमार व या घटनेचे व्हायरल झालेले व्हिडिओ यामुळे बारामती तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. झेंडा कोणत्याही पक्षाचा असो, मात्र त्यांचा दांडा हा मराठा समाजाचा आहे, जो आरक्षण देईल, त्याच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा राहील, असा निर्धार आज बारामतीत मराठा क्रांती मोर्चा(Maratha Kranti Morcha) च्या वतीने व्यक्त केला गेला.
राजकीय पक्ष मतभेद बाजूला ठेवून मराठा समाजातील अनेक युवक, पदाधिकारी, कार्यकर्ते या घटनेचा निषेध करण्यासाठी बाहेर पडले आहेत. काटेवाडी परिसरामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सोमवारी सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवण्यात आले आहेत. परिसरातील हजारो समाजबांधव बारामती शहरातील निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.
यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आली. तसेच गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी आता मराठा समाजामधून जोर धरू लागली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.