एसटी बसही सोडू न शकणाऱ्यांनी विमानतळाची बतावणी करू : वळसे पाटलांची टीका

एसटी बसही सोडू न शकणाऱ्यांनी विमानतळाची बतावणी करू : वळसे पाटलांची टीका

घोडेगाव : विधानसभेचा अध्यक्ष असताना तांबडेमळा- मंचर येथे एसटी डेपो मंजूर करून उभाही केला पण शिवसेना- भाजप युती सरकारच्या काळात पाच वर्षात त्यांना आगारात एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करता आली नाही. तसेच एसटीहि सोडता न आलेल्यांनी विमानतळाविषयी व विकास कामांविषयी बतावणी करू नये, अशी टीका आंबेगाव - शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी- कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव न घेता केली.

 चास, महाळुंगे पडवळ, साकोरे, नांदूर, लौकी, कळंब येथे झालेल्या प्रचार सभेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी सचिन भोर, तुलसी भोर, उषा कानडे, प्रमोद कानडे, प्रभाकर बांगर, सरपंच सुजाता बारवे, महादू भोर, सरपंच अनिल सैद, अण्णा पडवळ, अशोक डोके, अरूण चासकर, प्रशांत सैद, गणेश आवटे उपस्थित होते.

 वळसे पाटील म्हणाले, " भीमाशंकर कारखाना, बाजार समिती, गोवर्धन दुध प्रकल्प, मोरडे फुड्स, पराग कारखाना व वेस्टन फूड्स यांच्या माध्यमातून सहा हजार तरुणांना हक्काचा रोजगार दिला आहे. नजीकच्या काळात रांजणगाव येथे ३०० बेडचे अद्यावत हॉस्पिटल, औद्योगिक वसाहतीत स्थानिक तरुणांना प्राधान्याने रोजगार, भीमाशंकर पर्यटनाला चालना, शेती प्रक्रिया उद्योग, चांडोली खुर्द येथे बाजार संकुल उभारणार आदी कामांमुळे रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात वाव मिळेल. दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. आंबेगाव प्रमाणेच शिरूर तालुक्यातील ३९ गावांनी मला मनापासून साथ दिली आहे.

निकम म्हणाले, " राजाराम बाणखेले यांनी तब्बल १४ वर्ष राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये विविध पदे उपभोगूनही एकदाही घडयाळाला मत दिले नाही, असे ते प्रचारात सांगतात. हा त्यांचा प्रामाणिकपणा. त्यांच्या राजकारणातील कोलांटउड्या थक्क करणाऱ्या आहेत. १९९९ मध्ये शिवसेना सोडून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश, २०१७ मध्ये पंचायत समितीची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेला जय महाराष्ट्र करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. विधानसभेची उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी दोन दिवस आधी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या निष्ठेला तोड नाही. दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, किसनराव बाणखेले व शिवाजीराव पाटील यांच्यावर शिवराळ भाषेत नेहमीच त्यांनी टिका केली आहे. त्यामुळे जनतेने अशासंधी साधूला धडा शिकवावा."

शरद शिंदे, पी. डी. सैद, के. के. सैद, मुकूंद बारवे, सतिश चासकर, तारा धर्मा, प्रिया बारवे आदींची भाषणे झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com