वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण - Wadgaon Sheri MLA Sunil Tingre infected with corona | Politics Marathi News - Sarkarnama

वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

टिंगरे यांना दोनतीन दिवसापूर्वी ताप आला होतो. त्यांची कोरोनाची तपासणी केली असता त्याचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. 

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरी मतदार संघातील आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत टिंगरे यांनी टि्वट करून याबाबतची माहिती दिली आहे. टिंगरे यांना दोनतीन दिवसापूर्वी ताप आला होतो. त्यांची कोरोनाची तपासणी केली असता त्याचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. 

याबाबत त्यांनी टि्वटमध्ये आहे की कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्यानंतर, माझी चाचणी करण्यात आली आणि माझा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झालो आहे.

गेल्या काही दिवसात माझ्याशी संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की कृपया लक्षणे आढळल्यास लगेच चाचणी करावी, आणि विलगीकरणाचे नियम पाळावे. काल वडगाव शेरी येथे गॅस सिलिडरचा स्फोट झाला होता. या घटनेची पाहणी करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे त्याठिकाणी आले होते. त्यांच्यासोबत स्थानिक नगरसेवक आणि अन्य कार्यकर्ते होते. यावेळी सामाजिक सुरक्षा पाळण्यात आली नव्हती.

काल पुण्यात दिवसभरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ६२७ रुग्ण आहेत. शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार ११, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ६७४, नगरपालिका क्षेत्रात १७९ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ४४ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, गेल्या चोवीस तासांत ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये  पुणे शहरातील सर्वाधिक ४३ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १२, जिल्हा परिषद क्षेत्रातील ९, नगरपालिका ९ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. १) रात्री ९ वाजल्यापासून काल (ता. २) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

यामुळे आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ७७ हजार २८२,  कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ३७ हजार ६३८ तर  रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ४ हजार २५७ झाली आहे. मृत्यू  झालेल्यांमध्ये  पुणे जिल्ह्याबाहेरील १२१ रुग्ण आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख