वाबळेवाडी शाळा बंद पडणार नाही... आमदार अशोक पवारांनी सोडले मौन!

वाबळेवाडी शाळा पालकांकडून ५ ते २५ हजारांच्या देणग्या घेत असल्याची तक्रार काही दिवसांपासून आली येत होती.
वाबळेवाडी शाळा बंद पडणार नाही... आमदार अशोक पवारांनी सोडले मौन!
Bawalewadi Zilha Parishad School Sarkarnama

भरत पचंगे, शिक्रापूर

शिक्रापूर : वाबळेवाडी (ता.शिरूर) जिल्हा परिषद शाळेत (Bawalewadi Jilha Parishad School) मनमानी व्यवहार सुरु असल्याची तक्रार एका पालकाने (Parents) माझ्याकडे केली होती. या शाळेत विद्यार्थ्यांकडून (Students) २४ हजार रुपयांचे शुल्क (Fees)आकारणे, शाळेचे शुल्क खासगी व्यक्तीच्या नावावर भरणे, यांशिवाय आणखीही अपारदर्शी कामे या शाळेत सुरु असल्याची तक्रार माझ्याकडे आली, त्यानंतरच मी या प्रकरणात लक्ष घातले, असल्याची माहिती आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar) यांनी दिली.

तक्रारी व प्रश्न गंभीर असल्याने आपण या सर्व प्रकरणाच्या शेवटपर्यंत जाऊन सामान्य गरीब विद्यार्थी-पालकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अर्थात शाळेची चौकशी सुरू झाल्यानंतर शाळा बंद पडणार असल्याच्या वावड्या उठविल्या जात आहेत. पण असं काहीही होणार नसल्याचेही यावेळी आमदार पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Bawalewadi Zilha  Parishad School
अमित साटम यांचे आयुक्तांना पत्र, रस्त्याचे राजकारण आणखी पेटण्याची चिन्हे

दरम्यान, वाबळेवाडी शाळा पालकांकडून ५ ते २५ हजारांच्या देणग्या घेत असल्याची तक्रार आल्याने प्रशासनाकडून शाळेकडे माहिती मागविली होती. ज्यांच्या पाल्यांना या शाळेत प्रवेश मिळाला नाही, अशा काहींनी जिल्हा परिषदेकडे शाळेच्या तक्रारी केल्या. शाळेतील एकाही पालकाची तक्रार नसताना बाहेरील व्यक्तीच्या तक्रारीवरुन वाबळेवाडीत गदारोळ सुरू झाला आहे.

आमदार पवार यांनी सरकारनामाशी बोलताना या प्रकरणावर अखेर मौन सोडले. राज्याच्या अर्थसंकल्पात वाबळेवाडी शाळेसारख्या राज्यात १५०० शाळा करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी ५ हजार कोटींची तरतूद उपमुख्यमंत्री अजित दादांनी केली. हे माझ्या मतदार संघासाठी भूषणाव आहे. मात्र शाळा जिल्हा परिषदेची, त्यात सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिकावेत असे सरकारला अपेक्षित असताना इथे एकेका विद्यार्थ्याना २५ हजार रुपये शुल्काचे बंधन का?, प्रवेश नियमावलीच नाही आणि दोघांना विचारुनच प्रवेश का?, केवळ हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश आणि स्थानिक राजकीय पदाधिका-यांना शाळेत बोलाविलेच जात नाही हेही गंभीर आहे.

याच तक्रारी एका पालकाने लेखी केल्यावर शाळेची चौकशी लागली आणि मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देवून राजीनामा देत असल्याचे जाहीर करुन सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला. कारभारच स्वच्छ असेल तर चौकशीला त्यांनी का घाबरावे. ग्रामस्थ, राजकीय व्यक्ती, शिक्षक संघटना यांची दिशाभूल करून चौकशी समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न सध्या सुरू असून मंत्रालयातील एका माजी सचिवाशी वारे यांचे लागेबांधे असल्याने ते अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याच्याही तक्रारी आहेत.

आम्ही वाबळेवाडी शाळेच्या प्रकरणात कधीच पक्षीय राजकारण आणले नसताना वाबळेवाडी शाळेत भाजपचे नेते का बोलावून घेतले जातात हेच समजत नाही. भाजपाचे संजय पाचंगे हे आंदोलनाची भूमिका कसे काय जाहीर करतात? शाळेबद्दलच्या तक्रारीनंतर एकाच रात्रीत सर्व पालकांना शुल्क परत कसे दिले गेले? हे प्रश्न गंभीर आहेत. शाळा ही एक-दोन व्यक्तींच्या इशाऱ्यावर चालते अशीही चर्चा परिसरात आहे.

इयत्ता आठवीपर्यंतच शाळेला वर्ग भरविण्यास परवानगी असताना पुढच्या वर्गाचे प्रवेश नसलेले व इतर खाजगी शाळेत प्रवेश असलेले विद्यार्थी वाबळेवाडीतच कसे शिकतात? दरवर्षीची ग्रामस्थांनी लोकवर्गणी, कंपन्यांचे सीएसआर फंड, स्वयंसेवी संस्थाच्या देणग्या यातून या शाळेची कामे होत असताना, पालकांच्या देणग्या का घेतल्या जातात? असे अनेक प्रश्न यावेळी पवार यांनी उपस्थित करुन शाळेला मी भविष्यात मदत करणार आहे. इतकेच नव्हे तर शाळेच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व सोडवणार असल्याचेही यावेळी आमदार अशोक पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.