अजित पवारांचा कारखाना चालविणारे वीरधवल जगदाळे प्राप्तीकर छाप्यानंतर म्हणाले...

प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती विचारण्यासाठी वीरधवल जगदाळे यांना बोलविले होते.
अजित पवारांचा कारखाना चालविणारे वीरधवल जगदाळे प्राप्तीकर छाप्यानंतर म्हणाले...
Daund sugar FactorySarkarnam

दौंड (जि. पुणे) : दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेडकडून नियमितपणे प्राप्तीकर भरला जातो. प्राप्तीकर विभागाच्या शोध मोहिमेचे नेमके प्रयोजन माहित नाही. मात्र, विभागाला जी माहिती लागेल ती दिली जाईल व पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी माहिती दौंड शुगरचे संचालक तथा पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य वीरधवल कृष्णराव जगदाळे यांनी दिली आहे. (Virdhawal Jagdale said, Income tax department will be given the information it needs!)

दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कारखान्याच्या कार्यालयात आज (ता. ७ आक्टोबर) सकाळी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहिम सुरू केली. अधिकाऱ्यांनी कार्यालयातील कागदपत्रांची पाहणी केली. कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांना या बाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘प्राप्तीकर विभागाचे अधिकारी आल्याची माहिती कार्यकारी संचालकांनी दिली. परंतु माझ्या मातोश्री तथा दौंडच्या माजी आमदार श्रीमती उषादेवी कृष्णराव जगदाळे यांना उपचारार्थ पुणे येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून मी त्यांच्यासमवेत आहे. कारखाना गेली १३ वर्षे व्यवस्थितपणे सुरू असून कुठलीही अनियमितता नाही. आजपर्यंत तक्रार नाही.’’

Daund sugar Factory
पवारांचीही तीव्र प्रतिक्रिया : व्यवहाराशी संबंध नसलेल्या मुलींवर छापे, हा अतिरेक

प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती विचारण्यासाठी वीरधवल जगदाळे यांना बोलविले होते. त्यानुसार जगदाळे हे कारखान्यात दाखल झाले; परंतु त्यासंबंधी तपशील उपलब्ध झाला नाही.

Daund sugar Factory
माझ्या बहिणींच्या कारखान्यांवर का छापे टाकले ?

दौंड सहकारी ते दौंड शुगरचा प्रवास

दौंडचे दिवंगत माजी आमदार कृष्णराव बाजीराव जगदाळे यांनी शेतकऱ्यांकडून भागभांडवल जमा करून स्थापन केलेल्या नियोजित दौंड सहकारी साखर कारखान्याचे २००९ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शुगर लिमिटेड या खासगी कारखान्यात रूपांतर झाले होते. अजित पवार यांचे निकटवर्तीय तथा देवळाली प्रवरा (ता. राहुरी, जि. नगर) येथील जगदीश कदम या कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

Related Stories

No stories found.