Kasaba By-Election : भाजप उमेदवार अडचणीत;आचारसंहितेचा भंग, कारवाई होणार?

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज चुरशीने मतदान होत आहे.
Kasaba By-Election :
Kasaba By-Election :Sarkarnama

कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. मतदान करताना थेट मतदान केंद्रात पक्षचिन्ह असलेला रुमाल वापरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ते सध्या अडचणीत आले आहेत. हेमंत रासनेंनी आचारसंहिता शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी कारवाई करणार का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

आज सकाळी सात वाजता कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानास सुरवात झाली. कसब्यात भाजपचे हेमंत रासने विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर अशी दुहेरी लढत आहे. तर चिंचवड मतदारसंघाचा आघाडीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होत आहे.

Kasaba By-Election :
BJP Leader's Claim : शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसही संपणार : भाजपच्या बड्या नेत्याचा धक्कादायक दावा

मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाच्या जवळ भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्यांचे प्रदर्शन करण्यास मनाई असते असे करणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन समजले जाते. हेमंत रासने थेट मतदान कक्षात पक्षाची ओळख असलेला रुमाल गळ्यात घालून गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता आयोग त्यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com