Vinayak Nimhan : कट्टर शिवसैनिक ते कॉंग्रेसचे आमदार; विनायक निम्हणांचा संघर्षमय प्रवास !

कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तरी वागण्या-बोलण्यातून त्यांच्यातला शिवसैनिक कायम समोर यायचा.
Vinayak Nimhan
Vinayak Nimhan Sarkarnama

Vinayak Nimhan : पुण्यातील शिवाजीनगरचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे आज आकस्मिक निधन झाले. तीनवेळा पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे नेतृत्व केलेले निम्हण हे पुण्यातल्या शिवसेनेच्या कट्टर शिलेदारांपैकी एक होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत त्यांनी शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तरी वागण्या-बोलण्यातून त्यांच्यातला शिवसैनिक कायम समोर यायचा.२०१४ ची निवडणूक हरल्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, अलिकडच्या काही वर्षात पक्षात ते फारसे सक्रिय नव्हते.

शिवसेनेचे त्यावेळचे पुण्याचे नेते शशिकांत सुतार (Shashikant Sutar) यांच्याऐवजी १९९९ च्या निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघातून निम्हण यांना पहिल्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली. त्यानंतर २००४ च्या निवडणुकीत ते पुन्हा निवडणूक लढवून आमदार झाले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बंड केले. त्यांच्यासोबत आमदार असलेल्या निम्हण यांनीही शिवसेना सोडली व कॉंग्रेसमध्ये सामील झाले. २००९ ची निवडणूक कॉंग्रेसकडून लढवत ते तिसऱ्यांदा आमदार झाले. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला.

Vinayak Nimhan
मुख्यमंत्री म्हणाले, सरकारच्या कामांत सर्वसामान्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब उमटेल…

शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून त्यांनी धडाडीने काम केले. विविध नागरी प्रश्‍नांवर त्यांनी आंदोलने केली. अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या विषयावर त्यांनी पुणे महापालिकेवर काढलेला प्रचंड मोर्चा आजही अनेकांच्या लक्षात आहे. शहरप्रमुख असताना शिवसैनिकांचे जाळे त्यांनी अधिक घट्ट केले. पक्षाची संघटना बांधण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. शहरप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळताना अनेक सामाजिक संघटनांशी संपर्क ठेवत सामाजिक कामातही भाग घेतला.

Vinayak Nimhan
केंद्राच्या कररचनेवर शरद पवार नाराज; थेट मोदींवर सोडले टीकास्त्र

‘पुणे आयडॉल’ महोत्सव तसेच शरीर सौष्ठव यासारख्या स्पर्धा त्यांनी अनेक वर्षे घेतल्या. निम्हण (Vinayak Nimhan) यांच्यामागे कार्यकर्त्यांचे पाठबळ मोठे होते. त्यामुळे शिवसेना सोडल्यानंतरदेखील ते कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. पक्षाचे सक्रिय काम कमी केले तरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क आजही होता. गेल्या काही वर्षात सक्रिय राजकारणापासून काहिसे दूर असलेले निम्हण यांनी स्वत:ला व्यवसायात गुंतवून घेतले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com