'शरद पवारांच्या मेट्रो पाहणीने चंद्रकांत पाटलांना मिरच्या का झोंबल्या?'

शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुणे मेट्रोची (Pune metro) ट्रायल घेऊन पाहणी केली. या पाहणीवर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आक्षेप घेतला होता
'शरद पवारांच्या मेट्रो पाहणीने चंद्रकांत पाटलांना मिरच्या का झोंबल्या?'

पिंपरी-चिंचवड : 'कोल्हापुरकरांच्या (kolhapur) नाराजीच्या पुरात वाहत आलेल्या आणि पुण्यातील आयत्या मतदार संघावर स्थिरावलेल्या चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) मेट्रो प्रशासनाला उपदेशाचे डोस पाजण्याची गरज नाही, अशा शब्दांत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोमवारी (१७ जानेवारी) शरद पवार यांनी पुणे मेट्रोची ट्रायल घेऊन पाहणी केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी मेट्रो किती सक्षम आहे, याचा आढावा त्यांनी प्रत्यक्ष प्रवास करून घेतला. या पाहणीवर चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला.

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांमध्ये नागपूरमध्ये बसून पुण्यातील कामाचा आढावा घेण्याची पध्दत नाही. लोकांच्या समस्यांचे सुटेपर्यत पाठपुरावा करणे हे पवार घराण्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या मेट्रो पाहणीमुळे पाटील यांना मिरच्या झोंबायचे कारण नाही, असा सणसणीत टोलाही विलास लांडे यांनी लगावाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाहणी दौ-याने अस्वस्थ झालेल्या चंद्रकांत पाटलांनी राजकीय सुडबुध्दीतून टीका केली. पण त्यांनी टीका करताना आपली राजकीय सामाजिक उंची तपासून तोलून मापून बोलावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

'शरद पवारांच्या मेट्रो पाहणीने चंद्रकांत पाटलांना मिरच्या का झोंबल्या?'
यशवंत जाधवांचे पद धोक्यात?: मुंबईकरांचे किशोरी पेडणेकरांकडे लक्ष

स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल का घेतली ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. तसेच. पुण्याचे एवढे आमदार, खासदार, महापौर असताना पवारच मेट्रोची ट्रायल घेण्यासाठी का गेले असेही त्यांनी विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना विलास लांडे यांनी चंद्रकांत पाटलांना सडेतोड उत्तर दिले.

''मुळातच पुणे व पिंपरी-चिंचवडच्या लोकप्रतिनिधींना जनतेची काळजी असती तर त्यांनी केव्हाच मेट्रोची पाहणी केली असती. भाजपच्या लोकप्रतिनिधींना पाहणी करण्यापासून कोणीच रोखलेले नाही. पण ज्यावेळी मेट्रोचे काम रखडले होते त्यावेळी त्याची दखल कोणत्याही भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी घेतली नाही. तुम्ही स्वत: सुध्दा पुण्यातले आमदार असूनही त्याचा पाठपुरावा केला नाही. म्हणून आज शरद पवार यांनी स्वतः पाहणी करुन मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. पुणे व पिंपरी-चिंचवडकरांचा सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सकाळी सहा वाजताच मेट्रोच्या कामाची पाहणी केली, पुणेकरांनीही अजित पवारांच्या कामाचे कौतुक केले. असेही विलास लांडे यांनी सांगितले.

'शरद पवारांच्या मेट्रो पाहणीने चंद्रकांत पाटलांना मिरच्या का झोंबल्या?'
Shocking; महापालिकेने कोरोनाबळींची आकडेवारी दडवली?

सत्ताधा-यांच्या नाकर्तेपणामुळे प्रस्तावित ‘डीपीआर’ मंजुरीविना पडून

पुण्यात आठपैकी सहा भाजपचे आमदार आहेत. खासदार त्यांचे आहेत. राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर हे ही त्यांचेच आहेत. पिंपरी-चिंचवडला दोन भाजपचे आमदार व महापौर आहेत. असे असताना मेट्रोच्या ट्रायलसाठी फक्त पवारच का गेले ? असाही सवाल पाटील यांनी केला होता. त्यावर पिंपरी ते निगडी मेट्रोच्या ‘डीपीआर’ला केंद्र सरकारने अद्यापही मंजुरी दिलेली नाही. केंद्रात भाजपाची एकहाती सत्ता आहे.

हा ‘डीपीआर’ मंजूर करण्यासाठी पाटील आणि त्यांचे ढिगभर प्रतिनिधी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाठपुरावा का करत नाहीत अशी विचारणा लांडे यांनी केली. तसेच पुणे शहराप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहराची वेगळी ओळख आहे. पुण्यामध्ये मेट्रोचे पुणे मेट्रो असे नामकरण आहे, तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये सुध्दा पिंपरी-चिंचवड महामेट्रो असे नामकरण करण्यात यावे. यासाठी अनेकदा मागणी करून देखील फडणवीस सरकारच्या कार्यकाळात त्याची दखल घेतली गेली नाही. हा प्रकार म्हणजे पिपंरी-चिंचवडकरांच्या सन्मानावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे, असेही लांडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com