Vikaram Gokhale : विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

Vikaram Gokhale| गुरुवारी (२५ नोव्हेंबर) सोशल मीडियावर त्यांच्य निधनाच्या अफवाही पसरवल्या गेल्या.
Vikaram Gokhale
Vikaram Gokhale

Vikaram Gokhale पुणे : ज्येठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या तब्येतील आश्वासक सुधारणा होत आहे. पुढील 48 तासात व्हेंटिलेटरवर काढले जाण्याची शक्यता आहे. डोळे उघडे करतायत, हात पाय हलवत आहेत, अशी माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली आहे. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ.धनंजय केळकर त्यांच्यावर उपचार करत आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून विक्रम गोखले दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत.  पण दोन दिवसांपुर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर गुरुवारी (२५ नोव्हेंबर) सोशल मीडियावर त्यांच्य निधनाच्या अफवाही पसरवल्या गेल्या. त्यानंतर अजय देवगण, रितेश देशमुख, अली गोनी, जावेद जाफरी यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विटरवर शोक व्यक्त केला.

Vikaram Gokhale
Ravikant Tupkar : तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनाचे यश : शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य!

पण गोखले यांचे जवळचे मित्र राजेश दामले यांनी त्यांची सद्याची परिस्थिती चिंताजनक आहे, पण कोणत्याही चुकीची माहिती वा अफवांवर विश्वास ठेवू नका. गोखलेंचे अनेक अवयव निकामी झाले आहेत. डॉक्टर प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांचं शरीर अपेक्षित प्रतिसाद देत नाही, असे दामले यांनी सांगितलं. त्यानंतर आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in