विक्रम गोखलेंची प्रकृती चिंताजनक, निधनाची बातमी अफवाच : जवळच्या मित्राची माहिती!

Vikram Gokhale : अफवांवर विश्वास ठेवू नका.
Vikram Gokhale
Vikram Gokhalesarkarnam

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृतीबाबत माहिती मिळत आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांचे जवळचे मित्र राजेश दामले यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली. विक्रम गोखले यांची सद्याची परिस्थिती चिंताजनक आहे, पण कोणत्याही चुकीची माहिती वा अफवांवर विश्वास ठेवू नका. गोखलेंचे अनेक अवयव निकामी झाले आहेत. डॉक्टर प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांचं शरीर अपेक्षित प्रतिसाद देत नाही, असे दामले म्हणाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Vikram Gokhale
कोणाची माय व्यायली आहे, माझ्यावर टीका करायला - विक्रम गोखले

राजेश दामले म्हणाले, 'गोखलेंची परिस्थिती मागील २४ तासांपासून प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांचे प्रयत्न करत आहेत. उपचारांना शरीर साथ देत नाही. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. शरीराचे अनेक अवयव निकामी झाले आहेत. कोणत्याही अफवा, चुकीची माहिती पसरवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका.

दरम्यान त्यांच्या निधनाचे खोटी बातमी पसरली होती. सोशल मीडियावर गोखले यांना श्रद्धांजलीही अर्पण होत होती. अनेक कलाकार यांना विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहिली, माध्यमांमध्ये बातम्या पसरल्या. मात्र त्यांची पत्नी आणि मुलीने हे वृत्त फेटाळले. निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र त्यांची तब्येत चिंताजनक असल्याची माहिती कुटुंबाने दिली.

Vikram Gokhale
'उपरा'कार संतापले, विक्रम गोखलेंनी आठ दिवसात माफी मागावी, अन्यथा..

गोखले यांच्या पत्नी वृषाली यांनी असे सांगितले की, 'काल दुपारच्या दरम्यान कोमात गेले, त्यानंतर त्यांनी स्पर्शाला, प्रतिसाद दिला नाही. गोखले हे आता व्हेंटिलेटरवर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in