विखे-पाटील सकारात्मक बोलले; पण थोरातांना कळलेच नाही

नगर जिल्ह्यातील थोरात आणि विखे-पाटील (Thorat And Vikhe-Patil) यांच्यातील राजकीय स्पर्धा सर्वश्रृत आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील-बाळासाहेब थोरात

राधाकृष्ण विखे-पाटील-बाळासाहेब थोरात

सरकारनामा

पुणे : विधानसभेत वाळू, पीक विमा या विषयावर प्रश्‍नोत्तराच्या तासातच चर्चा सुरू होती.सदस्य आपआपल्या परीने विषय मांडत होते.वाळूच्या विषयावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उत्तर देण्याचा प्रयत्न करीत होते. या दरम्यान राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushna Vikhe-Patil) यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी ड्रोनसारख्या आधुनिक साधनांचा वापर करण्याचा फडणवीस यांनी दिलेला सल्ला उचलून धरला.मात्र,त्यावर बोलताना मंत्री थोरात यांनी विखे-पाटलांना मी नकारात्मक उत्तर कसे देणार असे सांगत त्यांची मागणी ग्राह्य धरली.त्याला उत्तर देताना विखे पाटील यांनी आपण दिलेला सल्ला सकारात्मक दिला होता तो थोरातांना नकारात्मक कसा वाटतो याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले.

<div class="paragraphs"><p>राधाकृष्ण विखे-पाटील-बाळासाहेब थोरात</p></div>
अधिवेशनात पहिलाच प्रश्‍न पुरंदरचा; तरीही आमदार संजय जगताप गैरहजर

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरवात झाली. पहिल्याच दिवशी प्रश्‍नोत्तराच्या तासात शेतकऱ्यांचे नुकसान, पीकविमा, वाळू माफियावरील कारवाई यावर चर्चा झाली.या चर्चेला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उत्तर देत होते. यावेळी बोलताना विखे-पाटील यांनी सूचना केली. ते म्हणाले, पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी किंवा वाळूचा उपसा प्रकरणात जियो मॅपिंग ड्रोनच्या सहायाने करण्याचा प्रयत्न महसूल विभाग करणार आहे का हा खरा प्रश्‍न आहे. यावर बोलताना थोरात यांनी विखे-पाटलांच्या सूचनेवर नकारात्मक उत्तर मला देता येणार नाही असे म्हणत त्यांच्या सूचनेचा योग्य विचार करण्याचे आश्‍वासन थोरात यांनी दिले.त्यावर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुन्हा खुलासा केला. मी केलेली सूचना सकारात्मक होती. मंत्री महोदयांना ती सूचना नकारात्मक कशी वाटते याचे आश्‍चर्य वाटते, असे ते म्हणाले.

<div class="paragraphs"><p>राधाकृष्ण विखे-पाटील-बाळासाहेब थोरात</p></div>
‘टीईटी’च्या गेल्या महिन्यात झालेल्या परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय

नगर जिल्ह्यातील थोरात आणि विखे-पाटील यांच्यातील राजकीय स्पर्धा सर्वश्रृत आहे.या पाश्‍र्वभूमीवर थोरात-विखे पाटील यांच्यात सभागृहातील ही जुगलबंदी चर्चेचा विषय ठरली.नगर जिल्ह्याच्या राजकारणात या दोन राजकारण्यांमध्ये सातत्याने एकमेकांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू असतात.आज विधानसभेच्या सभागृहातदेखील या दोघांमधील राजकारणाची प्रचिती आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com