चहा न पिता लोकांची कामे केल्यानेच विजय - प्रदीप कंद

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Pune District Central Bank) संचालक पदी भाजपच्या प्रदीप कंद (Pradeep Kand) यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या विजयाचे गुपित सांगितले आहे.
चहा न पिता लोकांची कामे केल्यानेच विजय - प्रदीप कंद
Pradeep Kand

वाघोली : कुणाचाही चहा न पिता लोकांची कामे केली. प्रत्येकाशी सौजन्याने वागलो. चांगले व विश्वासू मित्र तयार केले. म्हणूनच सर्वपक्षियांनी मला मदत केली व माझा विजय झाला, अशा शब्दांत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (Pune District Central Bank) नवनिर्वाचित भाजपचे (BJP) संचालक प्रदीप कंद (Pradip Kand) यांनी आपल्या असे विजयाचे गुपित उलगडले. (Pune Latest Political news)

केसनंद ग्रामपंचायतीच्या (Kesnand Grampanchayat) विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण कंद यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा व विकास दांगट यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. 'सहकारात मी प्रथमच निवडणूक लढविली. मला सहकारातील निवडणुकीचा न ही माहिती नव्हता. मात्र 20 दिवसांत प्रचार करून निवडून आलो. हे केवळ लोकांची कामे केल्यामुळेच. तरुणांनो केवळ राजकारण न करता आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी व्यवसायकडेही लक्ष द्या. असा सल्लाही त्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या कामासाठीच आपले संचालक पद असेल, असे आश्वासनही कंद यांनी दिले. हवेली तालुक्याचे नाव उज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्रित या, असे आवाहनही त्यांनी केले. ग्रामनिधीतील लाखो रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण यावेळी करण्यात आले.

Pradeep Kand
पडळकरांनी केले एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन; तर अनिल परबांना करुन दिली 'ती' आठवण

- ज्यांनी स्थापना केली त्यांचाच विसर

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 100 वर्ष पूर्ण झाले. या कार्यक्रमात ज्यांनी बँकेची स्थापना केली त्यांचा उल्लेखही करण्यात आला नाही. ही खेदाची बाब आहे. तसेच बँकेच्या मतदार गटातील मतदार संस्थांचीही उलटा पालट करण्यात आली. हे ही सहकार मोडीत काढण्याचा प्रकार असल्याची टीका माजी सभापती रोहिदास उंदरे यांनी केली.

- आता राष्ट्रवादी मोठा भाऊ झाला

पूर्वी तालुक्यात शिवसेना मोठी होती. नंतर भाजप मोठा भाऊ कधी झाला ते कळले नाही. आता शिवसेना राष्ट्रवादी एकत्र आहे. मात्र आता राष्ट्रवादी मोठा भाऊ कधी झाला हे सुद्धा कळले नाही. असा टोला तालुक्याचे शिवसेना प्रमुख प्रशांत काळभोर यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.