निर्मला जागडेंच्या विजयाने वेल्ह्याला तब्बल २५ वर्षांनंतर मिळाले दोन संचालक!

रेवणनाथ दारवटकर हे सलग सातव्यांदा संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत
pdcc bank election

pdcc bank election

sarkarnama

वेल्हे (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (pdcc bank election) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) महिला गटातील वेल्हे तालुक्यातील उमेदवार निर्मला कृष्णा जागडे यांनी दुसऱ्या क्रमांकाची (२४८८) मते घेत दणदणीत विजय मिळविला. त्यांच्या या विजयामुळे तब्बल २५ वर्षांनंतर वेल्ह्यातील दोन व्यक्तींना जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रेवणनाथ दारवटकर हे सलग सातव्यांदा संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. (Velhe taluka got two directors of district bank after 25 years)

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक 'अ' वर्ग गटातून वेल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य, पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रेवणनाथ दारवटकर यांची पुन्हा बिनविरोध झाली आहे. ते सलग सातव्यांदा जिल्हा बँकेचे संचालकपद भूषवणार आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या व राजगड सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालिका शोभा जाधव ह्या वेल्हे तालुक्यातून १९९६ मध्ये संचालिका म्हणून निवडून आल्या होत्या. जिल्हा बँकेच्या चार वर्षे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यानंतर वेल्हे तालुक्यास दुसऱ्या संचालकपदाची संधी मिळाली नव्हती.

pdcc bank election

आत्माराम कलाटेंची २२ वर्षांची बॅंकेतील सत्ता नवख्या चांदेरेंनी संपवली!

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना डावलत निर्मला जागडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या २००७ मध्ये वेल्हे पंचायत समितीच्या सदस्यपदी निवडून आल्या होत्या. त्यांनी २००९ ते २०१२ या कालावधीत वेल्हे पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले होते.

pdcc bank election

‘साथ कुणी दिली...ऽ बारामती...ऽऽ’ : कार्यकर्त्यांच्या या घोषणेबाबत कंद म्हणाले...

रेवणनाथ दारवटकर यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये वेल्हे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता गेली ३५ वर्षांपासून आहे. त्यामुळे वेल्हे तालुक्यात निर्मला जागडे यांना शंभर टक्के मतदान झाले. तालुक्यातील ३४ पैकी ३४ मते जागडे यांना पडली. त्यांच्या उमेदवारीसाठी रेवणनाथ दारवटकर यांच्या सूचनेनुसार सूचक, अनुमोदक अनुक्रमे हे शंकर चाळेकर व संतोष मोरे हे झाले होते.

pdcc bank election

अशोक पवारांनी धोका ओळखून फिल्डिंग लावली; पण कंदांनी विजयाची संधी साधलीच!

दरम्यान, संचालकपदी निवडून आल्यानंतर निर्मला जागडे यांनी वेल्हे येथील मेंगाई देवीचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या वेळी जिल्हा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद देशमाने, जिल्हा सरचिटणीस तानाजी मांगडे, जिल्हा राष्ट्रवादी युवकचे संदीप खुटवड,राष्ट्रवादीची माजी अध्यक्ष शंकर भुरुक, सुरवडचे सरपंच अशोक सरपाले, वेल्ह्याचे माजी सरपंच संतोष मोरे, उपसरपंच सुनील राजीवडे, अनिल पवार, प्रमोद लोहकरे, कृष्णा जागडे, बाबू गोरड, विलास खुटवड, बाळासाहेब शिद्रुक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in