भाजपची लोकसभेसाठी जय्यत तयारी : वासुदेव काळे, योगेश टिळेकरांवर बिहारमधील मतदारसंघाची जबाबदारी!

पुणे शहरातून माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यावरही एका विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Vasudev Kale
Vasudev KaleSarkarnama

केडगाव (जि. पुणे) : आगामी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मोठे यश मिळविण्याच्या हेतूने भाजप (BJP) आतापासूनच कामाला लागला आहे. भाजपच्या किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्यावर बिहारमधील (Bihar) पारू विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे (Pune) जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून वासुदेव काळे (Vasudev Kale), तर पुणे शहरातून माजी आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांच्यावरही एका विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Vasudev Kale in charge of one constituency in Bihar)

वासुदेव काळे हे २६ व्या वर्षी भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष, तर २८ व्या वर्षी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले होते. पडत्या काळातही त्यांनी भाजपची साथ सोडली नाही. भाजपने त्यांना २०२१ मध्ये किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष केले. पश्चिम महाराष्ट्रातील धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याचे काम ते करत आहेत. काळे यांनी तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे. काळे यांची काम करण्याची पद्धत व पक्षनिष्ठा यामुळे त्यांना भाजपचा वरदहस्त राहिला आहे.

Vasudev Kale
शिंदे-फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची अडचण महाराष्ट्राला एकदा सांगूनच टाकावी : अजित पवार

या पक्षकृपेमुळेच त्यांना बिहारमधील एका विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील पारू विधानसभा मतदार संघाची जबाबदारी काळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी थोड्या कालावधीसाठी आहे. निवड झाल्यानंतर काळे बिहारला रवाना झाले आहेत. काळे यांनी बिहारमधील पारू मतदार संघात तेथील भाजपचे विद्यमान आमदार अशोककुमार सिंह यांच्याबरोबर बैठका घेण्यास सुरवात केली आहे. आमदार अशोककुमार हे पारू मतदार संघातून चार वेळा विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. या दरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते, अडचणी, अपेक्षा जाणून घेणे, बूथ कमिट्यांचे नियोजन करणे, मतदार याद्यांवर चर्चा करणे, मतदारसंघाचे दौरे करणे, वरिष्ठांना अहवाल देणे आदी कामे काळे करणार आहेत.

Vasudev Kale
गिरीश महाजन ‘ॲक्शन मोड’मध्ये : खडसेंना धक्का दिलेल्या जळगाव दूध संघाचे प्रशासकपद चव्हाणांनी स्वीकारले!

पारू येथील सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वासुदेव काळे म्हणाले,‘‘भाजपच्या काळात शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना १०० टक्के लोकांपर्यंत पोचत आहेत. काँग्रेसच्या काळात हेच प्रमाण १५ टक्के होते. समाजातील शेवटच्या माणसाचा विचार भाजपचे नेतृत्व करत असते. काँग्रेसला सक्षम नेतृत्व नसल्याने हा पक्ष खिळखिळा झाला आहे.’’

Vasudev Kale
शिंदे-फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची अडचण महाराष्ट्राला एकदा सांगूनच टाकावी : अजित पवार

‘सरकारनामा’शी बोलताना आमदार अशोकुमार सिंह यांनी काळे यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पारू विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळेल. गेली चार टर्म मी पारू मतदारसंघाचा चौकीदार म्हणून काम करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in