Vasant More : राजकारणाचं काही खरं नाही..; वसंत मोरेंच्या फेसबुक पोस्टने पुन्हा चर्चांना उधाण...

राज ठाकरेंनी नुकतेच एक पत्रक काढून पदाधिकाऱ्यांना तंंबी दिली होती
Raj Thackeray News, Vasant More News, MNS News
Raj Thackeray News, Vasant More News, MNS NewsSarkarnama

Vasant More Latest news : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपुर्वी कार्यकर्त्यांना चांगलंंच झापलं आहे. पक्षांतर्गत गोष्टी सोशल मीडिया अथवा माध्यमांशी बोलल्या तर हकालपट्टी अटळ असल्याचा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे. अशातच राज ठाकरे यांनी ताकीद दिल्यानंतर पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांची सोशल मिडीयावर केलेली पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे.

वसंत मोरे शहर कोअर कमिटीतील अंतर्गत वादामुळे चांगलेच चर्चेत आले होते. यावरुन अनेकदा त्यांनी माध्यमांसमोर आपली जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. इतकंच नाही तर खडकवासला मतदारसंघातून अप्पा आखाडे यांना पक्षाने पद देण्याची मागणी फेसबुक पोस्टवर केली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी पत्राद्वारे पदाधिकाऱ्यांना इशारा दिला होता. त्यामुळे हे पत्र मोरें यांच्यासाठीच उद्देशून असल्याची चर्चा पुण्यात रंगू लागल्या आहेत.

Raj Thackeray News, Vasant More News, MNS News
Satara Politics : कार्यकर्त्यांनी आग्रह केला अन् महेश शिंदे....

राज ठाकरेंनी पत्रक काढल्यानंतर वसंत मोरेंनी आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे वसंत मोरे पुन्हा चर्चेत आले आहेत. 'राजकारणाचं काय खरं नाही, हे लोकं निवडणुका कधी घेतील माहिती नाय बाबा... जरा उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करतो' अशा आशयाची फेसबुक पोस्ट वसंत मोरेंनी केली आहे.

काय म्हटलं आहे, राज ठाकरेंनी आपल्या पत्रात?

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र,

सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही.

माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत. तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा. ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com