वसंत मोरे 'मविआ' नेत्यांसोबत; रोहित पवारांनी कानात सांगितला खास मेसेज

Vasant More | MNS : सुप्रिया सुळे, विजय शिवतारे यांच्याकडून गाडी थांबवून विचारपूस
Vasant More | MNS
Vasant More | MNSSarkarnama

(Vasant More Latest News)

पुणे : मागील काही काळापासून मनसे (MNS) सोडणार का? या प्रश्नाचे सातत्याने नाही असेच उत्तर देणारे पुण्याचे (Pune) मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी काल महाविकास आघाडीच्या मंत्र्यांसोबत खलबत केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी वसंत मोरे यांच्या कानात एक खास मेसेज देखील सांगितला. त्यामुळे कार्यक्रम संपेपर्यंत नेमका काय मेसेज सांगितला याची चर्चा रंगली होती.

काल किल्ले पुरंदरमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पुरंदर प्रतिष्ठाणच्या वतीने, पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात राज्याचे मंत्री विश्वजित कदम, पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप, कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन वसंत मोरे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी रोहित पवार यांनी वसंत मोरे यांच्या कानात काहीतरी गोष्ट सांगितली. मात्र ही गोष्ट नेमकी काय याची चर्चा कार्यक्रम संपेपर्यंत रंगली होती.

Vasant More | MNS
केतकी चितळे विरोधात शिवसेनेनेही बाह्या सरसावल्या!

यावर बोलताना वसंत मोरे म्हणाले, रोहित पवार यांनी कानात सांगितले की, तुम्ही एक गोष्ट चांगली केली की तुम्ही मनसेत राहिलात. वसंत मोरे पुढे म्हणाले, पुरस्कार हा मी केलेल्या कामाचा होता. पण चर्चा मात्र माझ्या मागील एक महिन्याच्या प्रवासाचीच होती. कार्यक्रमानंतर खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी गाडी थांबवून वसंत मोरे यांच्या कामाची चर्चा केली. वसंत मोरे यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या वाढत्या जवळीकतेने पुन्हा एकदा ते मनसे सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

Vasant More | MNS
ठाकरेंच्या मास्टर सभेनंतर भाजप आक्रमक; ट्विट करुन टीका अन् प्रत्यूत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालिसाने उत्तर देण्याचे आंदोलन पुकारल्यानंतर पुण्यात वसंत मोरे यांनी या आंदोलनात सहभागी होण्यास स्पष्ट नकार दर्शवला. त्यानंतर त्यांच्याकडून पुण्याच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली. तसेच ते मनसेवर आणि राज ठाकरे यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर राज ठाकरे यांची भेट घेवून वसंत मोरे यांनी आपली नाराजी देखील बोलून दाखविली होती. त्यामुळे आता वसंत मोरे यांचे पुढचे नेमके पाऊल कसे असणार याची चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com