"पक्षाचं १३ वर्षे काम करुन थकलो, म्हणून मी शांत : पण मनसे सोडून कुठेही जाणार नाही!"

MNS | Vasant More : वसंत मोरेंची तिरुपतीहुन परतल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया
"पक्षाचं १३ वर्षे काम करुन थकलो, म्हणून मी शांत : पण मनसे सोडून कुठेही जाणार नाही!"
Vasant More on MNSSARKARNAMA

मुंबई : मशिदींवरील भोंगे उतरवण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेली डेडलाईन संपल्यानंतर पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस दिली होती. तसेच औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्यावरही सभेतील नियमांचं उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल झाला होते. या दरम्यान मनसेचे बडे नेते नॉट रिचेबल झाले होते. तर मनसेचे माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) मात्र राज ठाकरे यांच्याकडे न जाता तिरुपती बालाजीला रवाना झाले होते. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होते.

मात्र आज तिरुपतीहुन परतल्यानंतर वसंत मोरे यांनी आपण आजही राज ठाकरे यांच्यासोबतच आहोत आणि उद्याही त्यांच्यासोबतच असू असे स्पष्ट केले आहे. मी दरवर्षी बालाजीला जात असतो, त्यामुळे मागच्या दीड महिन्यापूर्वी मी बुकिंग करुन ठेवलं होतं. ठाण्याच्या सभेला मी माझ्या घरचा कार्यक्रम रद्द करुन गेलो होतो. पण मी देखील एक माणूस आहे म्हणून मी माझ्या कुटुंबाला सध्या वेळ देत आहे, असे ते म्हणाले.

Vasant More on MNS
राजकारण तापलं! डिस्चार्जनंतर राणा दाम्पत्य ठाकरे सरकारला थेट दिल्लीतून अडचणीत आणणार?

आमच्या प्रभागात हनुमान चालीसा पठण झाली नाही. मी जरी इथे नसलो तरी माझे मनसैनिक सज्ज होते, त्यामुळे एखाद्या लढाईला सेनापती नसले तरी आमचे मनसैनिक लढाईला तयार आहेत, असेही मत मोरे यांनी व्यक्त केले. तसेच मी नेहमीच मनसेसोबत एकनिष्ठ आहे, काही मतभेद आहेत पण आमच्यात मनभेद नाहीत. पक्षांतर्गत कुरघोडी या पक्ष मोठा होत असताना होत असतात पण मी सध्या राजमार्गावरंच आहे." असेही त्यांनी स्पष्ट केले.

Vasant More on MNS
मलिकांना ७३ दिवसांपासून न्यायालयाचा दिलासा नाहीच : कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढवला

मोरे यांना त्यांच्या स्टेटसबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, "मी आजही राजमार्गावर आहे आणि उद्याही राजमार्गावरंच राहणार आहे. तुम्ही माझ्या स्टेटसमधील खालचे २ वाक्य वाचले पण सुरुवातीचे वाक्य तुम्ही वाचले नाही. त्यामुळे तुम्हाला तसं वाटंत असेल. पण सध्या मी पक्षाचं १३ वर्ष काम करुन थकलो आहे. त्यामुळे मी अस्वस्थ नसून शांत आहे आणि माझ्या कुटुंबाकडे, व्यवसायाकडे लक्ष देत आहे, असेही ते म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.