नॉट रिचेबल असलेले मनसे नेते वसंत मोरेंनी फेसबूक वरुन दिले स्पष्टीकरण

अनेक ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी वसंत मोरे आंदोलनात दिसले नाही, त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
नॉट रिचेबल असलेले मनसे नेते वसंत मोरेंनी फेसबूक वरुन दिले स्पष्टीकरण
Vasant More, Raj Thackeraysarkarnama

पुणे : मनसेने (Maharashtra Navnirman Sena) मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. राज्यात बुधवारपासून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात पुण्यातील मनसेचे नेते, माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More)दिसले नाही, यावरुन उलट-सुलट चर्चा सुरु असताना खु्द्द वसंत मोरेंनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढीपाडव्याच्या सभेपासूनच वसंत मोरेंनी मनसेपासून अंतर राखण्यात सुरवात केली असल्याची चर्चा सुरु आहे. राज ठाकरे औरंगाबादच्या सभेला निघण्यापूर्वी मोरे यांचे पुण्यातील निवासस्थाना बाहेर पुरोहितांच्या साक्षीने मंत्रपठण करण्यात आले होते. त्यावेळी देखील वंसत मोरे गैरहजर होते.

काल राज्यात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी (MNS activists) मशिदींसमोर हनुमान चालीसाचं (Hanuman Chalisa) पठण केलं. तर काही ठिकाणी स्पीकरवर हनुमान चालीसा लावली. यावेळी अनेक ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी वसंत मोरे आंदोलनात दिसले नाही, त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

Vasant More, Raj Thackeray
विधानसभेच्या पराभवानंतर पहिल्यांदा अमित शहा आजपासून पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याबाबत वक्तव्य गुढीपाडव्याच्या सभेत केले होते. त्या वक्तव्यावर ठाकरे यांच्या भूमिकेशी आपण सहमत नसल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले होते. राज ठाकरे यांच्या वक्तव्याला सहमत नसल्याने त्यांच्याकडे असलेले पुण्याचे शहराध्यक्षपद काढून घेण्यात आले होते. यानंतर वसंत मोरे राज ठाकरेंना भेटायला गेले आणि त्यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली हे बाहेर आले नव्हते. पण वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत आपण काहीच गमावले नाही असे सांगितले होते.

Vasant More, Raj Thackeray
आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांचा शिवसेनेला धक्का!

कालच्या आंदोलना दिसले नसलेले वसंत मोर यांनी फेसबुक पोस्टमधून आपण कुठे होता, याचा खुलासा केला आहे. ते आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात...

पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय,

साहेबांच्या आदेशा नंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आणि आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे सांगितले.

म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार...!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.