महाआरतीनंतर वसंत मोरे थेट राज ठाकरेंच्या भेटीला; कार्यक्रम ठरवूनच परतले...

वसंत मोरे (Vasant More) यांनी घेतली राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट
Vasant More, Raj Thackeray
Vasant More, Raj Thackeraysarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात मनसेचे माजी पुणे शहर शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) कुठेच दिसले नव्हते. मात्र, अखेर वसंत मोरे यांनी शनिवारी कात्रज गावठाण येथील हनुमान मंदिरात महाआरती आयोजित केली होती. (Vasant More meet to Raj Thackeray)

दरम्यान, शनिवारी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. असे असताना ते मोरे यांच्या महाआरतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आज वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थान असलेल्या राजमहाल याठिकाणी ही भेट झाली.

Vasant More, Raj Thackeray
मी रोज सकाळी बोललो नाही तर पक्षाचा दिवसभर अजेंडा सेट होणार नाही!

या भेटीनंतर मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना मोरे म्हणाले ''राज साहेब काल पुण्यात येणार असल्याचे मला माहीत नव्हते. तुमच्या प्रसार माध्यमांमुळेच साहेब पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. मात्र, त्यापूर्वीच मी महाआरतीचे आयोजन केले होते. त्याबद्दल राज ठाकरे यांना मेसेज करून कळवले होते. महाआरतीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. महाआरतीनंतर आज राज साहेबांची भेट घेतली.

Vasant More, Raj Thackeray
IPS अधिकारी कृष्णप्रकाश यांची संपत्ती किती? ही घ्या यादी...

भेटीमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व घडामोडींबाबत चर्चा झाली. महाआरतीचे साहेबांनी कौतुक केले. तसेच साहेबांना काल येता आले नाही. मात्र, 'वसंत तू मिसळ महोत्सव घे, मी येतो,' असा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच त्यांना आणखी एका कार्यक्रमाबद्दल सांगितले. साहेब निश्चित लवकरच येतील, त्या कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करणार आहे, असेही वसंत मोरे यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com