वसंत मोरेंनी पक्षाचा वॉट्सअप ग्रुप सोडला; राज ठाकरेंकडूनही निमंत्रण नाही...

Vasant More | MNS | : वसंत मोरेंची नाराजी कायम
Vasant More News, Raj Thackeray, Vasant More latest news
Vasant More News, Raj Thackeray, Vasant More latest newsSarkarnama

पुणे : माजी नगरसेवक आणि मनसेचे (MSN) शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. राज ठाकरे (Raj Thackray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात घेतलेल्या भूमिकेवरुन नाराज होवून आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात आले. अशातच वसंत मोरे यांनी आज पक्षांतर्गत वादाला वैतागून पक्षाचा व्हॉट्सॲप ग्रुप सोडला असल्याचे वृत्त खात्रीलायक सुत्रांनी दिले आहे. विभाग प्रमुख, मनसेचे प्रमुख नेते असलेला व्हॉट्सॲप ग्रुप मोरे यांनी सोडला आहे. (Vasant More latest news)

याशिवाय राज ठाकरे यांच्याकडूनही मोरे यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचे वृत्त आहे. पुण्यातील नाराज मनसे पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबू वागसकर, अनिल शिदोरे आणि साईनाथ बाबर यांना 'शिवतीर्थ'वर पाचारण केले आहे. मात्र यात शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे मोरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे.

Vasant More News, Raj Thackeray, Vasant More latest news
वसंत मोरेंच्या विरोधात अफवांचे पेव... म्हणे मनसेचा फलक हटविला...

वसंत मोरेंनी दिला होता राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करण्यास नकार :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीच्या समोरील भोंगे न उतरवल्यास समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, अशा भूमिकेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होवून या आदेशाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमधील (Mumbai) चांदिवली, कुर्ला आणि अन्य भागात मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्यांवर हनुमान चालीसा लावली आहे. तर काही ठिकाणी भोंगे लावण्याचा प्रयत्न करत असलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

Vasant More News, Raj Thackeray, Vasant More latest news
‘भाजपचे शंभर दाऊद, तर सेनेचा एकच राऊत’

मात्र राज ठाकरे यांच्या याच आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच आपण राज ठाकरेंवर किंवा पक्षावर नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com