शहराध्यक्षपद गेलं तरी 'राज'दरबारी मोरेंचंच वजन; माझिरेंना हवं ते पद मिळवून दिलं

निलेश माझिरे यांनी नुकताच पक्षाला रामराम ठोकला होता.
MNS Vasant More Latest Marathi News
MNS Vasant More Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : नेत्यांवर ठपका ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) रामराम ठोकलेले निलेश माझिरे पुन्हा पक्षात परतले आहेत. माजी शहराध्यक्ष वसंत मोरे हे त्यांना थेट पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे घेऊन गेले होते. त्यानंतर माझिरे यांना मनसे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं आहे. त्यामुळे 'राज'दरबारी अजूनही मोरेंचं वजन असल्याची चर्चा आहे. (MNS Nilesh Mazire Latest News)

वसंत मोरे यांनी गुरूवारी फेसबुकवर राज ठाकरेंच्या भेटीचा फोटो पोस्ट केला आहे. 'हीच माझ्या कामाची पावती... राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते निलेश माझिरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना पुणे जिल्हाअध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली,' असंही मोरे यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Vasant More and Nilesh Mazire Meet Raj Thackeray)

MNS Vasant More Latest Marathi News
भाजपचा पाचवा उमेदवार आणि सदाभाऊ खोत कसे जिंकणार? चंद्रकांत पाटलांनी सांगितली स्ट्रॅटेजी

निलेश माझिरे यांनी दोन दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. वसंत मोरे यांचे ते कट्टर समर्थक आहेत. मोरेही मनसेतील काही नेत्यांमुळे पक्षात नाराज आहेत. त्यांनीच याबाबत उघडपणे कबुलीही दिली आहे. पण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण माझिरे यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा या चर्चांना उधाण आलं होतं.

माझिरे यांनी पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यावर थेट आरोप केले होते. आपल्याला मनसे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्षपदापासून थांबवलं असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता मोरे यांनी माझिरेंना तेच पद मिळवून दिलं आहे. थेट राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी जात मोरेंनी माझिरेंना पुन्हा पक्षात आणलं आहे. त्यामुळे पुणे मनसेमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयावर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केल्यातनंतर पक्षाच्या शहराध्यक्ष पदावरून त्यांना हटवण्यात आले होते. त्यानंतर साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून मोरेंना वारंवार डावललं जात आहे. यावर राज ठाकरे हे शहर कार्यालयात येत नाहीत, तोपर्यंत शहर कार्यालयात जाणार नाही, अशी भूमिकाही वसंत मोरे यांनी जाहीरपणे घेतली होती. तेव्हापासून मोरे आणि मनसे पदाधिकारी यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com