वळसे-पाटील पहिल्यांदा पुणे पोलीस आयुक्तालयात आले आणि म्हणाले...

.सामाजिक स्वास्थ बिघडेल अशी चितावणीखोर वक्तव्ये कुणीही करू नये
valse patil.jpg
valse patil.jpg

पुणे : राज्यातील कोरोनाच्या स्थितीमुळे पोलीस व आरोग्य विभागावर गेले वर्षभर सतत ताण आहे. अशावेळी सामाजिक स्वास्थ बिघडेल अशी चितावणीखोर वक्तव्ये कुणीही करू नये असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे. त्या पाश्‍र्वभूमीवर वळसे-पाटील यांनी हा इशारा दिला आहे.(valse-Patil came to the Pune Police Commissionerate for the first time and said..)

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी रस्त्यावरू उतरून आंदोलन करण्याची गरज आहे. अशा आंदोलनांमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हिरीरिने सहभागी होतील, असे पाटील यांनी गुरूवारी म्हटले होते. या पाश्‍र्वभूमीवर वळसे-पाटील बोलत होते. गृहमंत्री झाल्यानंतर वळसे-पाटील यांनी पुणे पोलीस आयुक्तालयास पहिल्यांना भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘‘ समाजात वातावरण बिघडेल अशी भाषा कुणी करू नये. गेले वर्षभर पोलीस व आरोग्य विभागावर प्रचंड ताण आहे. अशावेळी कुणी चितावणीखोर भाषा वापरू नये. जालन्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या पोलीस आधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. पोलीस दलातील बदल्यांमध्ये पारदर्शकता असावी, पुणे पोलिसांनी बदल्यासाठी जनरल ट्रान्सपोर्ट पोलीस मॅनेजमेंट सिस्टीम (जीटीपीएमएस) प्रणाली विकसित केली आहे. त्याचा फायदा पोलीस दलाला होणार आहे. ही यंत्रणा चांगली आहे. इतर ठिकाणीदेखील ही यंत्रणा सुरु आहे. यामुळे बदल्यांमधील वशिलेबाजीवर नियंत्रण येण्यास मदत होईल.’’

गुंड आणि गुंडगिरीला पाठीशी घालणाऱ्या कोणत्याही आधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे वळसे-पाटील यांनी सांगितले. सराईत गुंड वाघाटवर पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे.यापुढे असे प्रकार झाल्यास कडक कारवाई केली जाईल. कुठल्याही प्रकाराची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com