Valentine Day Special : माजी मुख्यमंत्र्यांची अनोखी लव्हस्टोरी; कसं आहे अशोक आणि अमिता चव्हाणांचं नातं..

Ashok Chavhan : थेट प्रश्न अन् दिलाखुलास उत्तरे...
Ashok Chavhan :
Ashok Chavhan :Sarkarnama

Valentine Day Special : जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांची लव्ह स्टोरी 'सरकारनामा'ने वाचकांसाठी पुढे आणली आहे. त्यांची प्रेमकथा ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीप्रमाणे अतिशय रंजक आहे. वडील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांची लव्हस्टोरी हळूवार फुलत गेली.

कॉलेजमध्ये असताना अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांची मैत्री झाली. ही मैत्री हळूहळू मैत्रीच्या पलीकडे जाऊन, त्याचं रूपांतर प्रेमाच्या नात्यात होत गेलं. दोघांचीही घर जवळ - जवळ असल्याने त्यांची नियमित भेटी होत असत. दोन घरांप्रमाणे, ही दोन मनेही जवळ आली. आपल्या राजकीय आयुष्यात चढ-उतार येत असताना अमिता यांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली. महाराष्ट्राचा दिग्गज असा राजकारणी प्रेमासारख्या विषयावर बोलताना, हळवा होऊन जातो. व्हॅलेंटाईन दिवसाचं औचित्य साधून सरकारनामाने चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी प्रेम या नाजूक विषयावर बोलताना, ते हळवे झालेले पाहायला मिळाले.

Ashok Chavhan :
Maharashtra Congress News: गटातटाच्या राजकारणाला मूठमाती दिली तरच महाराष्ट्रात काँग्रेसला भवितव्य !

चव्हाणांना पहिला प्रश्न विचारण्यात आला की, 'तुमचं आणि अमिता चव्हाण यांचं जमलं कसं?' यावर उत्तर देताना चव्हाण म्हणाले, "हे वरच्याने जमवलं असं मी म्हणेन, व्हलेंटाईन हे फक्त निमित्त आहे. सगळ्या जोड्या हे ईश्वरच ठरवतो. यामुळे माझ्याही आयुष्याचा जोडीदार हा ईश्वरकृपेने ठरला. आमचं नातं जमलं, जुळलं आम्ही आज आनंदी आहोत."

'दोघांचीही वेगळी संस्कृती होती, यामध्ये यात अमिता वहिनींनी कसं निभावून नेलं? या प्रश्नावर चव्हाण म्हणाले की, "प्रेमाला सीमा नसतात, कसली बंधने नसतात. जातीचा नाही, समाजाचा नाही, केवळ व्यक्तिविषयी आपल्या असणाऱ्या भावना या महत्त्वाच्या असतात. आयुष्यात तेच महत्त्वाचं आहे." तुमच्या राजकीय कारकिर्दीत खडतर प्रसंग आले. यामध्ये अमिता वहिणींनी कशी साथ दिली? यावर चव्हाण म्हणाले की, "राजकारणामध्ये तसेच, व्यक्तिगत आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार आम्ही जवळून पाहिले, अनुभवले. एकमेकांना सांभाळून घेतलं. "

"राजकारणाचं करिअर एकूणचं धकाधकीचं असतं, यातून एकत्र वेळ मिळतो का? यावर बोलताना ते म्हणाले, "वेळ हा काढावा लागतो. मी स्वत: प्रयत्न करतो की, आठवड्यातून एक दोन दिवस कुटुंबासोबत घालवण्याचा निश्चित प्रयत्न करतो." यानंतर विचारण्यात आलं की, "शेवटचा चित्रपट कोणता पाहिला? यावर चव्हाण म्हणाले, "अजय देवगणचा दृश्यम २ पाहिला. पहिला भाग ही पाहिला होता. दुसरा भाग ही नुकताच पाहिला. हल्ली तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक पर्याय आहे. चित्रपट पाहायला रात्री वेळ मिळतो. "

"अमिता वहिणींनी बनवलेला कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो?" यावर चव्हाण म्हणाले, "तशी माझी आवड निवड काही नाही. समोर जे आलं ते खातो. जेवणाच्या बाबतीत मी टिपिकल नाही. तसं काही आता राहिलेलं नाही. जे समोर आलं ते खायंचं, हल्ली खाण्यावर बंधने खूप आहेत. अमुक खा, तमुक खा, असं नाही. जे समोर आलं ते खातो."

Ashok Chavhan :
Ashok Chavan : शरद पवार दोन दिवसांच्या सरकारसाठी पाठिंबा देतील, असं वाटत नाही !

"अमितावहिणींना तुम्ही सरकारनामाच्या माध्यमातून आजच्या दिवशी काय शुभेच्छा द्याल? यावर चव्हाण म्हणाले की, "एवढेच सांगेन की, ईश्वराने आतापर्यंत आपल्याला एकत्र आणलं. अनेक वर्षे या गोष्टीला झालेली आहेत. पुढच्या काळातसुद्धा आपल्याला आणि आपल्या दोन मुलींना चांगलं आयुष्य प्राप्त करून देण्यासाठी एकमेकांनी काम केलं पाहिजे. कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. आपल्या आईवडीलांची पुण्याई आजही आहे. याच पुण्याईला अनुसरून आपणही पुढे काम करत राहावं. कुटुंबाला चांगलं नावलौकिक प्राप्त व्हावा, या दृष्टीने प्रयत्नशील राहावं."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com