वडेट्टीवार दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत; मराठा मोर्चाकडून निषेध

सामाजिक सलोखा राखण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे.तेच मंत्री दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करीत आहेत.
पुणे शहर मराठा मोर्चा
पुणे शहर मराठा मोर्चा सरकारनामा

पुणे : मराठा समाज आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी वादग्रस्त व्यक्तव्य करून बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत मराठा मोर्चाच्यावतीने आज मंत्री वडेट्टीवर यांचा निषेध करण्यात आला.२६ फेब्रुवारी रोजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी हजारो मराठा तरूण मुंबईत जाणार असल्याची माहिती मोर्चाचे निमंत्रक राजेंद्र कोंढरे (Rajendra Kondhare) यांनी दिली.

पुणे शहर मराठा मोर्चा
टीईटी परीक्षा : अश्‍विनकुमारला मिळाले तब्बल पाच कोटी ३७ लाख

पुण्यात बोलताना कोंढरे यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्यावर टीका केली.ज्यांच्याकडे बहुजन कल्याण मंत्रालय आहे. सामाजिक सलोखा राखण्याची जबाबदारी आहे.तेच मंत्री दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करीत असल्याबद्दल कोंढरे यांनी वडेट्टीवार यांचा निषेध केला. ते म्हणाले, ‘‘ २६ फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानावर खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करणार आहेत.मराठा तरूण गनिमा कावा करून आझाद मैदानावर पोचतील.मराठा समाजाचे अनेक निर्णय प्रलंबित आहेत.मात्र, या सरकारमधील लोक या प्रश्‍नांच्या सोडवणुकीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत.’’

पुणे शहर मराठा मोर्चा
गुंड मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश; भाजपाचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार

गेल्या अनेक वर्षांपासून शिवजयंती १९ फेब्रुवारीला साजरी केली जाते. शिवजयंती दरवर्षीप्रमाणे याच तारखेला साजरी करण्यात यावी, अशी मराठा मोर्चाची भूमिका आहे.त्यात कोणताही बदल झालेला नाही, असे कोंढरे यांनी स्पष्ट केले.जातीय तेढ निर्माण होईल, अशी भाषा मत्री वडेट्टीवार यांनी वापरू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

संभाजीराजेंच्या उपोषणाबद्दल बोलताना वडेट्टीवार चुकीची भाषा वापरत आहेत.दोन्ही हातात तलवार घेऊन कुणावर वार करणार ? तसेच छत्रपती संभाजीराजे खरंच छत्रपती शाहू महाराजांचे वशंज ठरतात का? यासारखी समाजात तेढ निर्माण करणारी व्यक्तव्ये करीत आहेत.मंत्री वडेट्टीवार यांनी जबाबदारीने बोलावे. समाजात तेढ वाढेल अशी भाषा त्वरीत बंद करावी, असे कोंढरे यांनी सांगितले

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com