कुठल्या समाजाने ओबीसीत यावे हे ठरवणारे वडेट्टीवार कोण : मराठा क्रांती मोर्चाच्या कोंढरेंचा सवाल

राज्याचे मंत्री म्हणून विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना सर्व घटकांना समान न्याय देण्याची शपथ घेतली.
sar27.jpg
sar27.jpg

पुणे : राज्याचे मंत्री म्हणून विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना सर्व घटकांना समान न्याय देण्याची शपथ घेतली. मात्र, मंत्रीपदावर बसून मराठा विरोधी भूमिका घेत सर्वप्रथम सारथीची आपण राखरांगोळी केली. त्यानंतर अनेक वेळा मराठा समाजाविरोधी जाहीर स्टेटमेंट आपण दिलीत. मुळात कुठल्या समाजाने ओबीसीमध्ये यावे आणि येऊ नये हे सांगणारे विजय वडेट्टीवार कोण? असा प्रश्‍न मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केला आहे.

कोंढरे यांनी या संदर्भातील निवेदन सोशल मिडीयावर केले आहे. त्या ते म्हणतात, ‘‘ संविधान आणि घटनेची मालकी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी वडेट्टीवार यांच्या नावे केलेली आहे का? असा प्रश्‍नही कोंढरे यांनी विचारला आहे. कारण डॉ. आंबेडकर यांचे संविधान आणि घटनेनुसार मराठा आरक्षणासाठी जो गायकवाड आयोग स्थापन झाला त्यास बोगस म्हणण्यापर्यंत वडेट्टीवार यांची मजल गेली आहे. तुमच्या समाजासाठी तुमचा आवाज उचलून धरा त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. फक्त मराठा समाजाच्या विरोधी काही जाहीर स्टेटमेंट देण्याअगोदर आपली मंत्रीपदाची झूल बाजूला काढून वक्तव्य करा. मंत्रीपदाचे जोडे घालून अशी समाज विरोधी आणि संविधान, घटनाविरोधी वक्तव्य करायला परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेची मालकी तुमच्या नावाने केलेली नाही हे लक्षात असू द्या.’’

वडेट्टीवारांना बोलायची हौसच असेल तर एखाद्या समाजाला मागासवर्ग म्हणून दर्जा देताना घटनेने संवैधानिक आयोग नेमून त्याची शिफारस असणे आवश्यक केलेले असताना केवळ दोन पानाच्या शिफारसी वर अनेक घटक मागासवर्ग म्हणून घेतले गेले ते कसे काय यावर वडेट्टीवारांनी बोलायला हवे.मराठा समाजाचे प्रस्थापित राजकारणी अगदी सर्वच पक्षाचे कर्तृत्व शून्य निघालेत जे फक्त मुग गिळून बसलेत आणि विस्थापित गरीब मराठा अजून गरीब कसा होईल हा खेळ समाजाच समाजाने बघावे, अशी भूमिका घेऊन फक्त बघत बसलेत म्हणून वडेट्टीवार वगैरे लोकांचे फावतेय हेच कटू सत्य असल्याचे कोंढरे यांनी म्हटले आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com