नाराज दिलीप मोहिते अजितदादांच्या भेटीला; मतदानाबाबत केले सूचक वक्तव्य!

दिलीप मोहिते यांना घेण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे गेल्या होत्या. त्यांनी थेट अजितदादांच्या केबिनपर्यंत मोहिते यांना नेले.
Dilip Mohite News, NCP News
Dilip Mohite News, NCP News Sarkarnama

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत येताच ते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भेटीला त्यांच्या केबिनमध्ये गेले आहेत. या वेळी त्यांनी अजित पवार सांगतील, त्यांना मतदान करणार असल्याचे कॅमेऱ्यापुढे बोलताना सांगितले. त्यांना घेण्यासाठी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे या गेल्या होत्या. त्यांनी थेट अजितदादांच्या केबिनपर्यंत मोहिते यांना नेले. आमदार मोहिते यांच्यासोबत शिरूर-हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ॲड. अशोक पवार (Ashok Pawar) होते. (Upset MLA Dilip Mohite meets Ajit Pawar)

खेड मतदारसंघातील कामे होत नसल्याबद्दल आमदार दिलीप मोहिते हे नाराज आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादिवशीही त्यांनी याबाबत आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेत कामे होत नसल्याची तक्रार केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याशी चर्चा करत समजूत घातली होती. त्यानंतर ते मतदानाला तयार झाले होते. मात्र, त्यावेळी त्यांना विधान परिषद निवडणुकीपूर्वी तुमची कामे मार्गी लागतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, ती अद्याप मार्गी न लागल्याने मोहिते यांची नाराजी अद्याप कायम आहे. (Dilip Mohite News in Marathi)

Dilip Mohite News, NCP News
'हॉटेलवर असताना आमदारांना धमक्यांचे निरोप'; संजय राऊतांचा खळबळजनक खुलासा

अजित पवार यांच्या केबिनला जाण्यापूर्वी त्यांना कोणाला मतदान करणार असे प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यांना सांगतील त्यांना मी मतदान करणार आहे, असे कॅमेऱ्यासमोर स्पष्टपणे सांगितले. आमदार मोहिते यांना घेण्यासाठी एकनाथ खडसे यांना कन्या रोहिणी खडसे गेल्या होत्या. त्यांनी मोहिते यांना थेट अजितदादांच्या केबिनपर्यंत नेले.

Dilip Mohite News, NCP News
विधानपरिषद निवडणूक : पक्षादेश पाळणं आमच्या रक्तात : मुक्ता टिळक

दरम्यान, मुंबईला निघण्यापूर्वी आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीतील मतदानाबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुंबईत गेल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून मतदान करायचे की नाही. याबाबत ठरवणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. पण त्यानंतरही काही हालचाली झालेल्या दिसत नाहीत. एका दिवसात होणारी कामं अजून रखडली आहेत.

Dilip Mohite News, NCP News
दिलीप मोहितेंचा रूसवा जाईना; ‘त्या’ दोन नेत्यांना भेटून मतदानाचा निर्णय घेणार

माझ्या खेड मतदारसंघातील कामे थांबवली आहेत. विधान परिषद निवडणुकीआधी ती केली जातील, असे सांगितले होते. पण, ती अद्याप झाली नाहीत. त्याबाबात आता अजित पवारांची भेट घेऊन विचारणा करणार आहे. त्यानंतर अन्य नेत्यांशी बोलून निर्णय घेईन. पण, मी नाराजच आहे, असे मोहिते यांनी स्पष्ट केले होते.

Dilip Mohite News, NCP News
मुख्यमंत्री अलर्टवर; प्रत्येक विधानसभा आमदाराच्या मागावर विधान परिषदेचा एक सदस्य

राज्यसभा निवडणुकीनंतर चित्र पालटेल, असं वाटलं होतं. पण, त्या निवडणुकीत फटका बसूनही काहीही झालेलं नाही. हे नेते फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत. बाकी आमचा सवतासुभा कायम आहे, असे सांगून स्थानिक पातळीवर शिवसेना संघर्ष चालूच राहण्याचे संकेत आमदार दिलीप मोहिते यांनी दिले आहेत. ते पुढे म्हणाले होते की, आमच्या कामासंदर्भात सत्तेच्या प्रमुखांनी विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com