Eknath Shinde : आघाडी, युतीच्या दिग्गज नेत्यांमुळे वाढली प्रचारातील शेवटच्या टप्यात रंगत

By poll election : 'चिंचवड'साठी मुख्यमंत्र्यांचा पहाटे चारपर्यंत बैठकांचा धडाका
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

CM in Chinchwad : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा शेवटच्या टप्यात युती आणि आघाडीचे दिग्गज नेत्यांमुळे प्रचारात रंग भरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिवससभर कसब्यात आणि नंतर रात्री उशिरा म्हणजे चार वाजेपर्यंत चिंचवडमध्ये बैठका घेतल्या. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उद्या प्रचारात सहभाग घेणार आहेत.

आघाडीचे चिंचवडचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा आज रोड शो झाला.

युतीच्या उमदेवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्याकरिता उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रोड शो केला. तर, मुख्यमंत्री शिंदे चिंचवडमध्य़े उद्या रोड शो करणार आहेत.

काटे यांच्यासाठी स्वत: शरद पवारच (Sharad Pawar) उद्या प्रचारात उतरणार आहेत. यातून युती आणि आघाडी या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसून आले आहे.

Eknath Shinde
Who Is Gangster Raja Thakur : राऊतांनी आरोप केलेला ठाण्यातील गुंड आहे तरी कोण? : खूनप्रकरणी जन्मठेप; २०१९ पासून जामीनावर

प्रचाराला केवळ तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्व कामे बाजूला ठेवून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचा, अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी पिंपरी-चिंचवडमधील पक्ष पदाधिकाऱ्यांना केली. जगताप (Chinchwad) यांना निवडून आणण्यासाठी झोकून देवून काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.

Eknath Shinde
Election Commission News : निवडणूक आयोगाने मोठी चूक केली; असिम सरोदे स्पष्टच बोलले

काल रात्री ते प्रचाराचा आढावा घेण्यासाठी शहरात आले. थेरगावात शिंदेंनी पदाधिकारी बैठक घेतली. पहाटे चार वाजेपर्यंत त्यांच्या या बैठका सुरु होत्या. त्यांच्यासोबत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे विधीमंडळातील प्रतोद भरत गोगावले, शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील होते.

Eknath Shinde
Shivsena News : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक सुरू; 'हे' निर्णय होण्याची शक्यता

दरम्यान चिंचवडमधील भाजपच्या उमेदवार जगताप यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी चिंचवडमध्ये चांगलीच बटिंग केली. त्यांच्या सभेला लोकांचा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्यासाठी धनंजय मुंडे, जयंत पाटील, भास्कर जाधव यांनी सभा घेतली. त्या सभेलाही नागरिकांनी प्रतिसाद दिला. दरम्यान दोन्ही मतदास संघात दिग्गज नेते हजेरी लावत असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com