राष्ट्रवादीतील कलहामुळे एक सदस्य असलेल्या काँग्रेसला मिळाली सत्तेची खुर्ची!

भोर पंचायत समितीच्या उपसभापतिपदी काँग्रेसच्या रोहन बाठे यांची बिनविरोध निवड
Rohan Bathe
Rohan BatheSarkarnama

भोर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) सत्तासंघर्षाच्या कलहामुळे भोरमध्ये काँग्रेसला (Congress) सत्तेची खुर्ची मिळाली आहे. पंचायत समितीच्या उपसभापतिपदी काँग्रेसच्या रोहन बाठे यांची शुक्रवाारी (ता. १० डिसेंबर) बिनविरोध निवड झाली आहे. (Unopposed election of Rohan Bathe of Congress as Deputy Chairman of Bhor Panchayat Samiti)

भोर पंचायत समितीच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ४, तर काँग्रेस आाणि शिवसेनेने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. त्यामुळे भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये पदावरून संघर्ष वाढत गेला. शेवटी पक्षाला आपल्याच सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करावी लागली. पक्ष आदेशाचा भंग केल्यामुळे राष्ट्रवादीने श्रीधर किंद्रे, दमयंती जाधव व मंगल बोडके या पंचायत समितीच्या तीन सदस्यांची हकालपट्टी केली, त्यामुळे बहुमतातील राष्ट्रवादी पक्ष अल्पमतात आला. शेवटी महाआघाडीचे सूत्र भोरमध्येही लावण्यात आले. त्यानुसार पक्षाचे लहू शेलार हे सभापती झाले. मात्र, उपसभापतीपद मात्र काँग्रेसला द्यावे लागले.

Rohan Bathe
जयंत पाटलांच्या नेतृत्वाखालील आणखी एक संस्था बिनविरोध होणार?

भोर पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी (ता. १० डिसेंबर) दुपारी झालेल्या निवडणुकीसाठी उपसभापतीपदासाठी कॉंग्रेसचे रोहन बाठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या अर्जावर शिवसेनेच्या पूनम पांगारे ह्या सूचक होत्या. त्यानंतर सभापती शेलार सूचक असलेला बाठे यांचा दुसरा अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी पहिला अर्ज ग्राह्य धरून रोहन बाठे यांची उपसभापतिपदी निवड झाल्याचे जाहीर केले.

Rohan Bathe
बांदलांच्या जवळच्या नातेवाईकाला भोसले बॅंक गैरव्यवहारप्रकरणी अटक

सभापती लहू शेलार, सदस्य पूनम पांगारे व माजी उपसभापती अमोल पांगारे यांनी रोहन बाठे यांचे निवडीनंतर अभिनंदन केले. याशिवाय कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, भोरचे उपनगराध्यक्ष अमित सागळे, अमृता बाठे, रुणाल पवार, नगरसेवक सुमेत शेटे, चंद्रकांत मळेकर, जगदीश किरवे, गणेश मोहिते, बजरंग चव्हाण, विलास बोरगे, काळूराम मळेकर, विठ्ठल वरखडे आदींसह कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाठे यांचे अभिनंदन करीत गुलालाची उधळण केली. पंचायत समितीमध्ये २००६ नंतर प्रथमच पदाधिकारी होण्याचा मान रोहन बाठे यांना मिळाला असल्याचे शैलेश सोनवणे यांनी सांगितले.

Rohan Bathe
इचलकरंजीत भाजपची आवडे गटाशी युती होणार : चंद्रकांतदादांचे संकेत

भोर पंचायत समितीतही महाआघाडीची सत्ता

भोर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस या पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य असूनही सभापतिपदी राष्ट्रवादीचे लहू शेलार आणि उपसभापतिपदी कॉंग्रेसचे रोहन बाठे यांची बिनविरोध निवड झाली आहे, त्यामुळे पंचायत समितीमध्ये खऱ्या अर्थाने महाआघाडीचे सत्ता असल्याचे सिद्ध झाले आहे. महाआघाडीच्या सरकारच्या विविध योजनांचा सर्वसामान्यांना लाभ देण्याचा आणि त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसभापती रोहन बाठे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com