राष्ट्रवादीच्या रेवणनाथ दारवटकरांची सलग सातव्यांदा बाजी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे रेवणनाथ दारवटकर यांची पुणे जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड
Revannath Darwatkar
Revannath DarwatkarSarkarnama

वेल्हे (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या उमेदवारीसाठी वेल्हे तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) ज्येष्ठ संचालक रेवणनाथ दारवटकर (Revannath Darwatkar) आणि त्यांचे चिरंजीव उल्हास दारवटकर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणाचाही उमेदवारी अर्ज न आल्याने रेवणनाथ दारवटकर यांची पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बिनविरोध निवडीने सलग ३५ वर्षे जिल्हा बँकेचे संचालकपद भूषविण्याचा बहुमान दारवटकर यांना मिळणार आहे. (Unopposed election of Revannath Darwatkar of NCP on Pune District Bank)

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत वेल्हे तालुका सोसायटी अ वर्ग गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य, पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान संचालक रेवणनाथ दारवटकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. दारवटकर यांचे चिरंजीव उल्हास दारवटकर यांनीही डमी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या दोघांव्यतिरिक्त वेल्हे तालुक्यातून इतर कोणीही उमेदवारी अर्ज भरलेला नव्हता, त्यामुळे दारवटकर यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड होणार हे आता निश्चित झाले आहे.

Revannath Darwatkar
‘मला काही नको; आमच्या पक्षासाठी निधी द्या’ : कार्यकर्त्याच्या ‘प्रहार’ने अधिकारी घायाळ!

दारवटकर हे 1990 पासून आत्तापर्यंत सलग जिल्हा बँकेचे संचालक राहिले आहेत. सध्या जिल्हा बँकेवर त्यांच्या होणाऱ्या बिनविरोध निवडीने जिल्हा बँकेचे सलग 35 वर्षे संचालकपद भूषविण्याचा मान त्यांना मिळणार आहे.

Revannath Darwatkar
आमदार संग्राम थोपटेंची बिनविरोध निवड : जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाची हॅट्‌ट्रीक!

रेवणनाथ दारवटकर म्हणाले, ‘‘वेल्ह्यासारख्या दुर्गम तालुक्यात गेल्या तीस वर्षांपासून जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाची सेवा करतो आहे. जुन्या आणि नवीन निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे हे शक्य झाले आहे. पुढील काळातही बँकेच्या विविध सेवांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com