भाजपचा डाव; आढळरावांचे काय होणार?

केंद्रीय मंत्री रेणुका सिंग (Renuka Singh) यांच्या दौऱ्याने मतदार संघात चर्चा
Shivajirao Adhalarao Patil, Renuka Singh
Shivajirao Adhalarao Patil, Renuka Singhsarkarnama

शिक्रापूर : राज्यातील भाजपविरोधातील १६ मतदार संघांना टार्गेट करीत पक्षाने बारामतीनंतर शिरुरकडे लक्ष घालून तिथे केंद्रीय मंत्री रेणुका सिंग (Renuka Singh) यांना प्रभारी नेमले आहे. त्यामुळे लोकसभा-२०२४ ची तयारी सुरू केली आहे. या जागेवर भाजप (BJP) कुणाला उतरविणार हे अद्याप गुलदस्त्यात असतानाच पक्षाच्या या चालीने येथील शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांचे काय होणार हाही मतदार संघातील सध्याचा सर्वाधिक राजकीय चर्चेचा व उत्सूकतेचा विषय झालेला आहे.

सद्यस्थितीत उमेदवारी कुणाला ही चर्चाच मिथ्या असून घोडे मैदान लांब आहे, भाजप व शिंदे गट एकत्र आहे. योग्य वेळी योग्य निर्णय होईल आणि शिरुर पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून (NCP) खेचून आणून तिथे भगवाच फडकवू याचा निर्धार भाजपकडून शिरुरचे तालुकाध्यक्ष आबा सोनवणे तर शिंदेसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे यांनी सांगितले.

Shivajirao Adhalarao Patil, Renuka Singh
पटोले आले अन् आघाडीत मिठाचा खडा टाकून गेले!

आमदार माधुरी मिसाळ यांनी भोसरीत पत्रकार परिषद घेवून त्यात केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांच्या शिरुर मतदार संघाच्या प्रभारीपदासह त्यांच्या तीन दिवसांच्या आढावा दौ-याचीही माहिती दिली. सध्या भाजप-विरोधात खासदार असलेल्या शिरुरला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ताब्यात घेण्यासाठी हा दौरा आहे. अगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार निवडून येईल, असे म्हणत त्यांनी येथील उमेदवार भाजपचा असणार की, शिंदे गटाचा याची उत्सूकता निर्माण केली.

यावरच भाजप व शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. त्यानुसार उमेदवार निश्चिती ही निवडणुकीपूर्वी होत असते. विद्यमान सरकार हे भाजप-शिंदे गट असे आहे. त्यातच राज्यातील भाजप विरोधातील १६ लोकसभा मतदार संघात काहीही करुन तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक खासदार निवडून आणणे व त्यासाठी बुथ सशक्तीकरण करणे हे ध्येय आहे. पर्यायाने उमेदवार कुणाचा व कोण होणार ही चर्चाच मिथ्या असल्याचे शिरुरचे भाजप तालुकाध्यक्ष आबा सोनवणे यांनी सांगितले.

Shivajirao Adhalarao Patil, Renuka Singh
Aurangabad : दानवे म्हणाले, आमच्या पैठणचा बोक्या खोक्यांना विकला जाणारा नाही..

शिंदे गटाच्या वतीने शिरुरचे तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले की, शिरुरची लोकसभेची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने राष्ट्रवादीला बहाल केली, असा आरोप केला. माजी आढळराव यांचे राजकीय भवितव्यच उध्वस्थ करण्याचा डाव केवळ राष्ट्रवादीच्या सोयिसाठी टाकला होता. मात्र, शिरुर लोकसभा मतदार संघ छत्रपती शंभूराजे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींनी पावन असा असल्याने त्यावर पूर्ण भगव्याचा अधिकार आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे भाजप-शिंदेसेना जो काही निर्णय घेईल त्याप्रमाणे शिरुरमध्ये लोकसभा-२०२४ मध्ये निवडून येणारा खासदार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना बळ देणारा असेल, असा दावा त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in