केंद्रीय मंत्री रेणुका सिंहांच्या दाव्याने आढळराव पाटलांची धाकधूक वाढली

केंद्रीय मंत्री रेणुका सिंह (Renuka Singh) शिरुर मतदार संघाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत
Renuka Singh
Renuka Singhsarkarnama

Shirur : मंचर : शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपचे (BJP) संघटन मजबूत करणार आहे. लोकसभा निवडणुकीची जबाबदारी पक्षश्रेष्ठीने माझ्यावर सोपविली आहे. निवडणुका होईपर्यंत अजून पाच वेळा या भागात मी येणार आहेय त्या दौऱ्यांच्या माध्यमातून मतदार संघ पिंजून काढणार आहे. विकास हवा असेल तर येथे कमळ फुलले पाहिजे. खासदारही भाजपचाच हवा'' असे केंद्रीय विकास राज्यमंत्री रेणुका सिंह (Renuka Singh) यांनी सांगितले.

त्यामुळे विशेषतः शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) यांच्यासह त्यांच्या समर्थ कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. मंचर (ता.आंबेगाव) येथे बुधवारी (ता.१४) रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत सिंह बोलत होत्या. यावेळी आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात, अँड धर्मेंद्र खंडारे, आशा बुचके, जयसिंग एरंडे, विजय पवार, डॉ. ताराचंद कराळे, रुपाली घोलप, प्रा. उत्तम राक्षे, गणेश थोरात, नवनाथ थोरात उपस्थित होते.

Renuka Singh
Narayan Rane : नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला..; चर्चांना उधाण

सिंह म्हणाल्या 'महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदार संघात भाजपचा खासदार निवडणून आण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने रणनीती तयार केली आहे. त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. या मतदार संघातील सहा विधान क्षेत्रापैकी भोसरीमध्ये भाजपचे महेश लांडगे एकमेव आमदार आहेत. अन्य पाच मतदार संघावरही भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे काम सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये गटबंधन आहे. येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात आहेत. त्यांचीही मतदार संघात इच्छुक उमेदवार म्हणून चर्चा सुरु आहे. याबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांविषयी बोलतना सिंह म्हणाल्या 'येथे उमदेवार कोण? कोणत्या जातीचा? याबाबत मला बोलण्याचा अधिकार नाही. केंद्रीय नेतृत्वच याबाबत निर्णय घेणार आहे. असे सांगत असताना त्यांनी येथे कमळ फुलणार. असा पुनरउच्चार हसतच केला.

Renuka Singh
पंजाबमध्येही अॉपरेशन लोटस? २५ - २५ कोटींची आँफर : केजरीवालांचा आरोप

ठाकरे शिवसेना गटाने शिरूरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी सोडणार असून आढळराव पाटील यांनी शिरूर एवजी पुण्यातून निवडणूक लढवावी. असे संकेत शिवसेनेकडून दिले होते. त्यामुळे नाराज झालेले आढळराव पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रवेश केला. सिंह यांचे वक्तव्य व शिरूरचे यापुढे होणारे दौरे यामुळे आढळराव पाटील यांच्या अडचणी वाढणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com